बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या सर्वाधिक सुप्रसिद्ध मिळवारी नवाब बानू उर्फ निम्मी ( Nimmi) यांचे आज संध्याकाळी निधन झाले असून मुंबई (Mumbai) येथील राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून आजाराशी झुंज देणाऱ्या निम्मी यांनी आज 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर गुरूवारी 26 मार्च रोजी त्यांच्यावर मुंबईत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. निम्मी यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीमधील एका तारा पडद्याआड गेला आहे. तसेच त्यांच्या निधनानी बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. निम्मी यांनी 50 ते 60 च्या दशकात चित्रपट सृष्टीत आपली एक वेगळी छाप सोडली होती. त्यांनी बरसात चित्रपटापासून आपल्या जीवनाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अमर, दाग, दीदार, बसंत बहार, मेरे मेहबूब, कुंदन यांसारख्या चित्रपटात भुमिका साकारली होती.
निम्मी यांचा जन्म 18 फेब्रवारी 1933 मध्ये झाला होता. निम्मी यांचे खरे नाव नवाब बानू आहे. राज कपूर यांच्या बरसात चित्रपटात त्यांचे निम्मी नाव ठेवले होते. तेव्हापासून त्यांना निम्मी याच नावाने ओळखले जाऊ लागले. त्या लाहोरहून मुंबईत आल्यानंतर सरदार अख्तर आणि मेहबूब खान यांच्याकडे राहत होत्या. एकदा राजकपूर जद्दनबाई यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांना बरसात या चित्रपटासाठी हिरोइन हवी होती. दरम्यान त्यांचे निम्मी यांच्याकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी मेहबूब खान यांच्याजवळ जावून सांगितले ही मुलगी मला हिरोइन म्हणून हवी आहे. त्यावेळी निम्मी काही बोलल्या नाहीत. त्यांना त्यांच्या आजी काय म्हणतील याची भिती वाटत, असे निम्मी यांनी एका मुलाखातीत सांगितले होते. हे देखील वाचा- Gudi Padwa 2020: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने अस्सल मराठीत दिल्या गुढीपाडवा च्या शुभेच्छा; आजी, आई सोबतचा 'हा' खास फोटो केला शेअर (See Photo)
एएनआयचे ट्वीट-
Yesteryear Actor Nimmi passes away in Mumbai. She was 88. pic.twitter.com/0PpQo97ZzJ
— ANI (@ANI) March 25, 2020
सुरुवातीच्या काळात निम्मी यांना अधिक पसंद केले जात असे. दिलीप कुमार ते राज कपूर, अशोक कुमार, धर्मेंद्र यांच्यासारखे कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रयत्न करायचे असे बोलले जात आहे. राज कपून त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी अडून राहिले होते. निम्मी यांनी 1993 मध्ये एका मुलाखातीत म्हणाले होते की, मी चांगल्या भुमिका साकरली असते. मात्र, त्यांना कोणीही चांगला रोल दिला नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या.