पाकिस्तानी कलाकार वीणा मलिक हिने विंग कमांडरबाबत केले वादग्रस्त विधान, स्वरा भास्करने दिले असे प्रतिउत्तर
पाकिस्तानी कलाकार वीणा मलिक हिने विंग कमांडरबाबत केले वादग्रस्त विधान, स्वरा भास्करने दिले असे प्रतिउत्तर (Photo Credits-Facebook)

पाकिस्तानी कलाकार वीणा मलिक (Veena Malik) हिने भारतीय वायुसेनेच्या (Indian Air Force) विंग कमांडरवरुन वादग्रस्त विधान केले आहे. तसेच सोशल मीडियावर भारतीय कमांडरचा फोटो पोस्ट करुन असे लिहिले की, 'आताच तर आलात..चांगल्या पद्धतीने तुमचे स्वागत' झाल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे वीणा मलिक विरुद्ध नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.मात्र बॉलिवूड कलाकार स्वरा भास्कर हिने वीणाला चांगलेच सुनावले आहे. स्वरा भास्कर हिने ट्वीट करुन तुला लाज वाटली पाहिजे...अशा पद्धतीचा तु विचार करतेस म्हणून असे ट्वीटच्या माध्यमातून तिच्या विरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

स्वराने तिच्या ट्वीटमध्ये पुढे असे लिहिले आहे की,आमच्या भारतीय वायुसेनेचे कमांडर हीरो आहेत,शुरवीर असल्याचे प्रतिउत्तर वीणा मलिक हिला दिले आहे. (#BringBackAbhinandan: अमिताभ बच्चन, सुष्मिता सेन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या परतीसाठी केली प्रार्थना)

तर वीणाने वादग्रस्त विधान करुन भारताविरुद्ध असे म्हटले आहे की, हे दुश्मन-हे वत, आम्ही तुम्हाला सरप्राईज देऊ. मात्र स्वराने तिला या विधानावरुन चांगलेच झापले आहे.

वीणा मलिक ही बिग बॉस-4 मधून झळकली होती.त्यानंतर तिला खुप प्रसिद्धी मिळाली. तसेच काही चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांमध्ये ही वीणा दिसून आली होती.