#BringBackAbhinandan: अमिताभ बच्चन, सुष्मिता सेन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या परतीसाठी केली प्रार्थना
Amitabh Bachchan, Susmita Sen & Karan Johar (Photo Credit: File Photo)

भारतीय वायुसेनेचे (Indian Air Force) विंग कमांडर अभिनंदन वर्तमान (Abhinandan Varthaman) पाकिस्तानी सेनेच्या ताब्यात आहेत. देशावासी त्यांच्या परत पाठवण्याची मागणी करत आहेत. यात सर्वसामान्यच नाही बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी अभिनंदन यांच्या परतीची मागणी केली आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), करण जोहर (Karan Johar), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), सुष्मिता सेन (Sushmita Sen) या बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत अभिनंदन यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांच्या सुखरुप परतीसाठी प्रार्थना केली आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी अतिशय सूचक ट्विट केले आहे. बिग बी यांनी लिहिले की, "अभिनंदन... मान झुकवून... अभिनंदन."

याशिवाय करण जोहरने भारताला अभिनंदनचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. तर अर्जुन कपूर आणि सुष्मिता सेन यांनी विंग कमांडरच्या शौर्याला सलाम केला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे चोख उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 10 कॅम्प्स उद्धवस्थ केले. यात 200 हून अधिक दहशतावदी मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानी वायुसेनेने सीमेचे उल्लंघन केले. यात भारतीय वायुसेनेला पाकिस्तानाचे एक विमान पाडण्यात यश आले. मात्र पाकिस्तानी सेनेने विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना ताब्यात घेतले.