Urvashi Rautela (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  ही नेहमीच स्वतःच्या प्रेमात कसं राहावं याचे धडे सोशल मीडियावर आपल्या पोस्ट मधून देत असते, अशीच काहीशी सेल्फ ट्रीट म्हणून ती मालदीव (Maldiv) मध्ये सध्या व्हेकेशनची मजा घेत आहे. या ट्रीप मधला एक बिकिनी घातलेला फोटो तिने अलीकडे शेअर केला होता. नेहमीप्रमाणेच यामध्ये उर्वशी बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे.या फोटोमध्ये उर्वशी स्काय ब्लू रंगाच्या बिकिनी , हातात टोपी, केसात लाल रंगाचे फूल आणि डोळ्यावर गॉगल अशा लुक मध्ये दिसत आहे. हा एकूणच लूक तिला सूट होत असला तरी या फोटोत तिच्या Butt वर हाताचा ठसा उमटलेला दिसत आहे. अर्थात तुला तिथे कोणी हात लावला अश्या प्रश्नांचा या फोटोवर भडीमार झाला आहे. पूनम पांडे हिचा हॉट पिंक बिकिनी फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ; Miami Beach वर बोल्ड अंदाजात घेतेय सुट्टीची मजा

उर्वशी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. येथील एका समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनीमधील फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. “मालदीव हे स्वर्गासारखे आहे,” अशी कॅप्शन उर्वशीने या फोटोला दिली आहे. या हाताच्या ठस्याशिवाय सुद्धा अनेकांनी तिला ट्रोल करत तुला अंगप्रदर्शनाशिवाय दुसरं काही येतं का असेही सवाल केले आहेत.

उर्वशी रौतेला पोस्ट

दरम्यान, कोणाच्याही कुठल्याही कमेंटवर प्रतिक्रिया न देता उर्वशी आपला मी टाइम एन्जॉय करत आहे, चित्रपटाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ती सध्या उर्वशी जॉन इब्राहिमबरोबरच्या पागलपंती चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.