Sushant Singh Rajput Death: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर (Suicide) संपूर्ण चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली. सुशांतच्या चाहत्यांना त्याच्या आत्महत्येची बातमी आजही खाटी असल्याचं वाटत आहे. सुशांच्या आत्महत्येला एक महिला होऊन गेला. परंतु, त्याचे चाहते अजूनही या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर त्याच्या एका चाहत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा या घटनेची पुनर्वृत्ती घडली आहे. यासंदर्भात 'न्यू इंडियन एक्प्रेस' या इंग्रजी वेबसाईटने वृत्त प्रकाशित केलं आहे.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) भिलाई येथे सुशांतच्या एका सातवीत शिकणाऱ्या चाहतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या मुलीने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोटदेखील लिहून ठेवली आहे. सुशांतच्या आत्हत्येनंतर ही मुलगी अत्यंत दुःखी होती. त्यामुळे तिनेदेखील आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. यासंदर्भात तिने सुसाइड नोटमध्येदेखील लिहून ठेवलं आहे. (हेही वाचा - दाक्षिणात्य अभिनेता नितीनचा गर्लफ्रेन्ड शालिनी कंडूकुरी सोबत पार पडला साखरपुडा; पहा खास फोटोज)
विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी या मुलीने सुशांतचा 'छिछोरे' हा चित्रपट पाहिला होता. या मुलीचे वडील हे रायपूरमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत असून त्यांना एकूण 3 अपत्य आहेत. परंतु, यातील त्यांच्या मोठ्या मुलीनं आत्महत्या केली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी या मुलीची आई 2 मुलांना घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे ती घरात एकटीचं होती. या मुलीने आत्महत्येपूर्वी सुशांतचा छिछोरे हा सिनेमा पाहिला होता. (हेही वाचा - कोविड-19 संसर्गावर उपचार घेत असलेल्या अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता)
छिछोर चित्रपट पाहिल्यानंतर या मुलीने आपल्या वडिलांसोबत चर्चादेखील केली होती. तसेच तिला बाजारात सोबत येण्यासाठी विचारलंदेखील होतं. परंतु, तिने वडिलांसोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर तिचे वडील बाजारात गेले. मात्र, त्यानंतर काही वेळात जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी मुलीचा मृतदेह फासावर लटकताना पाहिलं. हा सर्व प्रकार पाहून त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताचं पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा - Dolly Bindra ने अनोळखी फोन नंबर वरून Harassment Calls येत असल्याने ट्वीटर वर मागितली मुंबई पोलिसांकडे मदत)
दरम्यान, या मुलीच्या आईने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सुशांतच्या मृत्यूनंतर ती त्याचे चित्रपट पाहत होती. त्याचे सर्व गाणेदेखील ती घरात गुणगुणत असे. परंतु, तिला सुशांतच्या आत्महत्येचा ऐवढा मोठा धक्का बसला आहे. हे आम्हाला माहित नव्हतं.