Telugu Actor Nithiin Gets Engaged To Shalini Kandukuri (PC - Twitter)

दाक्षिणात्य अभिनेता नितीनचा (Southern Actor Nithiin) गर्लफ्रेन्ड शालिनी कंडूकुरी (Shalini Kandukuri) सोबत साखरपुडा (Engagement) पार पडला आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांचे साखरपुड्यादरम्यानचे काही फोटो व्हायरल होत आहेत. येत्या 26 जुलै ला नितीन आणि शालिनी यांचे हैदराबादमधील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेस हॉटेलमध्ये विवाह सोहळा पार पडणार आहे.

नितीनच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पुढील 5 दिवस त्याच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. दरम्यान, 22 जुलैला नितीन आणि शालिनी कंडूकुरी यांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. नितीनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शालिनीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. (हेही वाचा - Pravasi Rojgar App: लॉकडाउनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद आता देणार रोजगार)

 

View this post on Instagram

 

Aaaand ENGAGED!! ❤️❤️❤️

A post shared by N I T H I I N (@actor_nithiin) on

 

View this post on Instagram

 

Here are few more from pasupu function 😊 #Nithiinshalini

A post shared by N I T H I I N (@actor_nithiin) on

 

View this post on Instagram

 

Pelli panulu started.. Mussssikk startttts ❤️❤️❤️ Need ur blessings...🤗🤗

A post shared by N I T H I I N (@actor_nithiin) on

नितीनने आपल्या लग्न सोहळ्याचं तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना भेटून निमंत्रण दिलं होतं. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नितीनच्या लग्नाला केवळ त्याचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.