Yeu Kashi Tashi Me Nandayla: 'येऊ कशी तशी मी नांदायला' च्या प्रोमोत दिसणारी अन्विता फलटणकर हिने रवी जाधव च्या 'ह्या' सुपरहिट चित्रपटात केली होती सहकलाकाराची भूमिका
Anvita Phaltankar (Photo Credits: Instagram)

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर मालिकांची एकापाठोपाठ एक मालिका सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी कारभारी लय भारी, देवमाणूस या मालिका आल्यानंतर आता लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla) असे या मालिकेचे नाव ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले या मालिकेत दिसणार आहे. त्यांच्यासोबत या मालिकेतून एक नवा चेहरा आपल्याला दिसत आहे. अन्विता फलटणकर (Anvita Falantankar) असे हिचे नाव असून हिने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र या मालिकेतून प्रथमच ती छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

अन्विता फलटणकर अलीकडे Gulz या चित्रपटात झळकली होती. पण हा चित्रपट फारसा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. तसेच याआधीही तिने एक सुपरहिट चित्रपटात काम केले होते. रवी जाधव दिग्दर्शित 'टाईमपास' या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.हेदेखील वाचा- Yeu Kashi Tashi Me Nandayla: 'येऊ कशी तशी मी नांदायला' झी मराठीची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या चित्रपटात तिने प्राजक्ता म्हणजेच केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. हे पात्र अगदी छोटे होते मात्र तरीही प्रेक्षकांनी अन्विताची ही भूमिका प्रचंड आवडली होती.

त्यानंतर तिने यू टर्न आणि गर्ल्स या चित्रपटात काम केले होते. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकले नाही.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका 4 जानेवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे. याचाच अर्थ झी मराठीवर 8 वाजता लागणारी मालिका‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही बंद होणार की, अजुन दुसरी कोणती मालिका बंद होऊन इतर मालिकेंच्या वेळेत बदल केला जाईल? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.