XXX Uncensored Season 2 Controversy वर एकता कपूर ने ही सोडले मौन; म्हणाली मी सुद्धा शांत बसणार नाही, Watch Video
Ekta Kapoor (Photo Credits: Twitter)

प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor)गेल्या काही दिवसांपासून XXX Uncensored Season 2 या कार्यक्रमाला घेऊन पुरती अडकली आहे. एकता कपूरच्या या शो मध्ये भारतीय सैन्य अधिकारीच्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने समोर आणण्यात आले आहे. यामुळे एकता कपूर विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. इतकच काय तर अनेकांनी तिच्याविरोधात आवाज उठवत या आक्षेपार्ह सीन्सवर जबरदस्त टिका केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबात अद्याप पर्यंत तरी एकता कपूरने काही स्पष्टीकरण दिले नव्हते. मात्र आता तिनेही यावर आपले मौन सोडले असून शोभा डे (Shobha De) शी खास बातचीत केली आहे.

एकता कपूरने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, "हा एक ऍडल्ट शो आहे. माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून एक चूक झाली. आम्ही ते पाहिले नव्हते. पाहिले असते तर नक्कीच काढून टाकले असते. आमच्याविरुद्ध FIR दाखल झाली. यानंतर आम्ही त्वरित हा सीन काढून टाकला होता. मी जवानांच्या पत्नींची माफी मागते. मात्र त्याचबरोबर सायबर बुलिंग सुद्धा सुरु झाली आहे. ज्यात मला खूप त्रास देण्यात आला आहे. मला आणि माझ्या आईला शिव्या देण्यात आल्या आहेत. इतकच नव्हे तर माझ्यावर बलात्कार करणार असल्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे. आता हा प्रश्न जवान आणि सेक्शुअल कंटेंटचा नसून एक मुलगी आणि तिची 71 वर्षांच्या आईवर बलात्कार करण्यावर आला आहे. याचा अर्थ सेक्स चुकीचे मात्र बलात्कार योग्य असा होतो का?"

हेदेखील वाचा- XXX Uncensored Season 2 Controversy: हिंदुस्तानी भाऊ ने एकता कपूर ला पद्मश्री पुरस्कार परत देण्याची केली मागणी, निर्माती ला म्हणाला - एक थी कबूतर, एकट्यातच ऐका हा व्हिडिओ (Ear Phones Recommeded)

एकता कपूर पुढे म्हणते की, "मला माफी मागण्यात काही कमीपणा वाटत नाही. मी सुद्धा जवानांचा आदर करते. आमची चूक आम्ही कबूल करुन तो सीन त्वरित हटवला. मात्र आता सायबर बुलिंगमुळे मला आणि माझ्या आईला जो त्रास झाला त्या विरोधात मी नक्कीच आवाज उठवणार आणि या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार. जेणेकरुन भविष्यात अन्य कोणत्याही मुलीसोबत असे व्हायला नको."

एकता कपूर विरोधात अनेकांनी आवाज उठवला. त्यात हिंदुस्तानी भाऊचा सुद्धा समावेश आहे.