ईशा केसकर ने सांगितलं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधून बाहेर पडण्याचं कारण (Watch Video)
Isha Keskar To Leave Mazya Navryachi Bayko (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वरील मालिका माझ्या नवऱ्याची बायको (Mazya Navryachi Bayko) मधील शनाया ही भूमिका अगदी अल्पावधीतच प्रसिद्ध झाली होती. सुरुवातीपासून ही भूमिका साकारलेली रसिका सुनील (Rasika Sunil) जेव्हा शिक्षणासाठी शो सोडून गेली होती तेव्हा मात्र तिच्या आणि मालिकेच्या फॅन्सची निराशा झाली होती, यानंतर हीच भूमिका बानुबाया म्हणजेच इशा केसकर (Isha Keskar) कडे गेली. आणि ईशाने सुद्धा अगदी कमी काळात या भूमिकेतून पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकून घेतली, पण आता इशा सुद्धा ही मालिका सोडत आहे. यामागचं कारण सांगत तिने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडीओ पोस्ट केलाय. एकीकडे जुनी शनाया म्हणजेच रसिका सुनील पुन्हा मालिकेत येत असल्याचा आनंद असताना ईशाला सुद्धा आम्ही नक्कीच मिस करू अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या व्हिडिओवर दिल्या आहेत. इशा मालिका सोडण्यामागे काय कारण आहे याबाबत सविस्तर वाचा.

लॉक डाऊन नंतर 29 जून पासून माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचे शूटिंग सुरु होणार होते. नाशिक मधील एका रिसॉर्ट मध्य हे शूटिंग व्हायचे होते, मात्र त्याआधीच ईशाला ताप येत होता. अक्कलदाढ काढल्याने हा ताप येत होता. ही दाढ काढण्यासाठी तिला ऑपरेशन करावं लागलं होतं आणि त्याची बरीच प्रोसेस अजूनही बाकी आहे, या कारणामुळं तिला शूटिंगला लगेचच जाता येणार नव्हतं. लॉक डाऊन मुले अगोदरच मालिकेचे बँक मधील एपिसोड्स संपले होते अशा वेळी नवीन शूटिंग थांबवता येणार नव्हतं म्हणून शेवटी ईशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

इशा केसकर इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

#IshaKeskar #Shanaya #OneLastTime #MazhyaNavryachiBayko #MNB #ZeeMarathi #ThankYou #Grateful #SeeYouSoon

A post shared by ISHA KESKAR (@ishackeskar) on

दरम्यान, येत्या आठवड्यात हे नवीन एपिसोड्स सुरु होण्याची शक्यता आहे. माझ्या नवर्‍याची बायको चे शुटींग जरी सुरु झाले असले तरी, शनाया म्हणजेच रसिका पुन्हा नेमकी कधी दिसणार याबाबत मालिकेच्या टीम कडुन काहीही सांगण्यात आलेले नाही.