सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'आई माझी काळुबाई' (Aai Mazi Kalubai) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) हिने मालिकेला रामराम ठोकला आहे. यापूर्वी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड 'आर्या'ची भूमिका साकारत होती. मात्र तिने अचानक मालिका सोडल्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मालिकेत वीणा जगतापची एन्ट्री झाली होती. परंतु, आता ती देखील मालिका सोडत असल्याने आर्याच्या भूमिकेत नवा चेहरा दिसणार आहे. (Aai Majhi Kalubai मालिकेतून प्राजक्ता गायकवाड ची एक्झिट; वीणा जगताप दिसणार मुख्य भूमिकेत)
प्राजक्ता गायकवाड हिच्यासोबत वाद झाल्याने तिने मालिकेतून काढता पाय घेतला होता. मात्र त्यावर निर्माती अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या दोघींच्याही वेगवेगळ्या भूमिका होत्या. त्यानंतर आर्याची भूमिका वीणा जगताप साकारत होती. मात्र तिने देखील काही महिन्यांतच मालिका सोडल्याने आर्याच्या भूमिकेत नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री रश्मी अनपट ही भूमिका साकारणार असून यापूर्वी तिने सुवासिनी, पुढचं पाऊल, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, फ्रेशर्स, कुलस्वामिनी यांसारख्या मालिकांमधून काम केले आहे.
अभिनेत्री रश्मी अनपट:
View this post on Instagram
दरम्यान, आई माझी काळुबाई मालिकेत अलका कुबल-आठल्ये, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्ना केतकर, संग्राम साळवी, अनिकेत केळकर, मंजूषा गोडसे, स्मिता ओक, प्राजक्ता दिघे, जान्हवी किल्लेकर, लीना दातार, पार्थ केतकर, शुभंकर एकबोटे, विवेक सांगळे हे कलाकार आहेत. आता रश्मी अनपट साकारणारी आर्या प्रेक्षकांना कितपत भावते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.