Mrinal Deshraj (Photo Credits-Instagram)

डिजिटल पद्धतीमुळे नागरिकांचे जीवन सुलभ झाले आहे. तर इंटरनेट बँकिंग आणि ऑनलाईन ट्रान्झेक्शनच्या माध्यमातून व्यवहाराला सुद्धा चालना मिळाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची पैशांच्या संदर्भात फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच पार्श्वभुमीवर टेलिव्हिजन अभिनेत्री मृणाल देशराज (Mrinal Deshraj) हिला सुद्धा गंडा घालण्यात आला आहे. मृणाल हिच्या खात्यामधूनल जवळजवळ 27 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. मृणाल हिच्यासोबत ही घटना 25 फेब्रुवारीला घडली आहे. हा प्रकार ऑनलाईन ट्रान्झेक्शनमुळे घडला आहे.

स्पॉटबॉयच्या नुसार, मृणाल हिने असे म्हटले आहे क तिच्या पेटीएम संदर्भात एक समस्या निर्माण झाल्याने पेमेंट थांबले. तसेच ट्रान्झेक्शन करताना तिला केवायसी पूर्ण करण्याबाबत मेसेज आला. तसेच पेटीएम सपोर्ट यांना मेसेज केला असता त्यांनी काही उत्तर दिले नाही पण 2500 रुपये सुद्धा ब्लॉक केले. त्यानंतर काही वेळाने एक फोन आला. त्यानंतर केवायसी पूर्ण करण्यासाठी सांगण्यासोबत एक लिंक सुद्धा पाठवली. त्या लिंकवर क्लिक केले असता खात्यामधून 758 रुपये काढले गेल्याचा मेसेज आला. त्या क्रमांकावर पुन्हा फोन केला असता त्यांनी दुसरी लिंक पाठवत असल्याचे म्हणत पैसे पुन्हा येतील असे सांगितले. मात्र असे काही न होता थेट खात्यामधून 27 हजार रुपये काढले गेले.(Paytm मध्ये कॅशबॅकच्या नावाखाली 10 कोटी रुपयांचा घोटाळा; कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच केली फसवणूक)

 

View this post on Instagram

 

I LOVE IT WHEN I CATCH YOU LOOKING AT ME♥️ : : #mreedazzle #mreenaldeshraj ♥️

A post shared by mreenal deshraj (@mreenaldeshraj) on

अभिनेत्रीने असे ही म्हटले आहे की, मी जमतारा शो पाहिला आणि त्या सारखाच फोन येईल असे वाटत होते. पेटीएम सपोर्टला मेसेज करत होती कारण त्यानंतर एक कॉल आला. ट्रूकॉलर सुद्धा क्रमांक तपासून पाहिला असता तेथे पेटीएमचे नाव दाखवत होते. त्यामुळे तो फेक कॉल नसल्याचे वाटले. या प्रकरणी मृणाल हिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.