इंटिमेट सीन देणं टीव्ही अभिनेत्री गरिमा जैन ला पडलं महाग, दोन महिन्यात साखरपुडा मोडला
Actress Garima Jain (Photo Credits: Instagram)

अलीकडे सिनेमा किंवा वेब सिरीज प्रमाणे टीव्ही मालिकांमध्ये सुद्धा बोल्ड आणि इंटिमेट सीन देण्याचा ट्रेंड सुरु आहे. पण हा प्रकार हिंदी मालिकांमधील अभिनेत्री गरिमा जैन(Garima jain) हिला चांगलंच महाग पडलं आहे. गरिमाचा भावी पती राहुल सराफ(Rahul Saraf) याने तिने मालिकेत केलेल्या एका इंटिमेट सीन (Intimate Scene) वरून चक्क त्यांचा साखरपुडा मोडला आहे. गरिमा ही शक्ति-अस्तित्व के एहसास की' (Shakti — Astitva Ke Ehsaas) या मालिकेत काम करते.13 जून 2019 ला राहुल सराफ सोबत तिचा साखरपुडा झाला होता. मात्र राहुलला तिने या क्षेत्रात काम करणे आवडत नव्हते या वरून गरिमा आणि राहुल यांच्यात सतत वाद होत होते त्यामुळे अखेरीस त्यांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला.

गरिमा जैन

गरिमाने अलीकडे बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत वाच्यता करत राहुल आणि आपल्यातील वादाविषयी सांगितले, आपण या नात्याविषयी थोडी घाई केली, एक दुसऱ्याला नीट ओळखून घेतल्याशिवाय आम्ही साखरपुडा केला . मात्र त्यानंतर साहजिकच दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीचा भाग असल्यानं आमच्यात मतभेद होऊ लागले. राहुलला आपलं मालिकेतां काम करणं, मॉडर्न कपडे घालणं पसंत नव्हतं, असे तिने सांगितले. तसेच नातं टिकवण्याचे बरेच प्रयत्न करूनही शेवटी गोष्टी आणखी बिघडत गेल्याने आम्ही हा साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी गरीमाने कबुली दिली.