लॉकडाऊनमुळे कमाईचा मार्ग बंद झाल्याने टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
Tv Actor Manmeet Grewal (PC - TWitter)

लॉकडाऊनमुळे (Lockdown) कमाईचा मार्ग बंद झाल्याने टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल (Tv Actor Manmeet Grewal) ने आपल्या खारघर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनमीतवर कर्जाचा बोजा होता. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. परिणामी मनमीतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मनमीत तणावाखाली होता. तो खारघर येथे आपल्या पत्नीसोबत राहत होता. लॉकडाऊनमुळे मनमीतकडे काम नव्हते. याच नैराश्यातून मनमीतने पत्नीच्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेनंतर मनमीतच्या पत्नीने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही मनजीतच्या पत्नीच्या मदतीला आलं नाही. (हेही वाचा - लॉक डाऊनमुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत चित्रपट; INOX, PVR ने व्यक्त केली नाराजी, निर्मात्यांना काही काळ थांबण्याची विनंती)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मनजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मनमीतने आतापर्यंत सब टीव्ही चॅनेलवरील ‘आदत से मजबूर’ आणि अ‍ॅण्ड चॅनेलच्या ‘कुलदीपक’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका केली होती.