पाहा 'तुला पाहते रे' मालिकेची फेअरवेल पार्टीमधील धमाल, मस्ती, झिंगाट डान्स आणि बरेच काही
Tula Pahate re Party (Photo Credits: Instagram)

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलेली झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' (Tula Pahate Re) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 20 जुलैला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल. नुकतीच या मालिकेच्या टीमने निरोप समारंभाची एक भन्नाट पार्टी केली. या फेअरवेल पार्टीत मालिकेतील सर्व कलाकारांसह मालिकेची तांत्रिक टीमसुद्धा उपस्थित होती.

या फेअरवेल पार्टीत मालिकेतील कलाकार विक्रांत, ईशा, मायरा, झेंडे,सोनिया सर्वच झिंगाट गाण्यावर थिरकताना दिसले. त्यात आकर्षणाचा भाग ठरला तो विक्रांत आणि ईशाचा झिंगाट डान्स.

या पार्टीत या मालिकेच्या संपुर्ण टीमला सुबोध भावेने एक खास भेट आठवण म्हणून दिली. ही भेट होती ती मालिकेतील त्या त्या कलाकाराचे मालिकेतील भूमिकेतले व्यंगचित्र. ही भेट पाहून संपुर्ण टीमचं खूप भावुक झाली होती.

अभिनेता सुबोध भावे ने या व्यंगचित्रांचा व्हिडिओ आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केला. सर्वांची लाडकी मालिका 'तुला पाहते रे' येत्या 20 जुलैला प्रेक्षकांचा निरोप घेत असून 22 जुलैपासून झी मराठीवर रात्री 8.30 वाजता एक नवीन मालिका सुरु होत आहे.

'तुला पाहते रे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल विक्रांत सरंजामेचा शेवट

'अग्गंबाई.. सासूबाई' असे या मालिकेचे नाव असून तेजश्री प्रधान ही सूनेच्या तर निवेदिता सराफ ही सासूच्या भूमिकेत दिसणार आहे.