Tu Chal Pudha Promo: अकुंश चौधरीची पत्नी दिपा परबचं मराठी मालिकेत पुनरागमन; ‘तू चाल पुढं’ मधून येणार रसिकांच्या भेटीला

झी मराठीची (Zee Marathi) नवी मालिका ‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका एका सामान्य गृहिनी आणि तिच्या स्वाप्नाबद्दलची असणार आहे. या कथेत सर्वसामान्य कुटूंब ज्यात सासू, सासरे, दोन मुलं, नवरा, बायको आणि ननंद या पात्रांचा समावेश आहे.  या मालिकेत कुटुंबाच्या गृहिनीची मुख्य भुमिका असणार आहे. कारण ही कथा गृहिणी, तिची घर चालवतानाची काटकसर तसेच तिने पाहिलेले स्वप्न आणि ते पुर्ण करणार असल्याच्या धडपडी बद्दलची असणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून अकुंश चौधरीची (Ankush Chaudhari) पत्नी दीपा परब (Deepa Parab) मराठी मालिका विश्वात पुनरागमन करणार आहे. तरी दिपाला छोट्या पडद्यावर बघणं सगळ्यांसाठीच उत्सूकतेच ठरणार आहे.

 

 

तसेच अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaonkar) पण तिच्या प्रेगन्सी ब्रेकनंतर (Pregnancy Break) ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून कमबॅंक (Comeback) करणार आहे. म्हणजे दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी मोठ्या कालवधीनंतर एकाच स्किनवर बघणं ही प्रेक्षकांसाठी मेजवाणी असणार आहे. मालिकेचा टीझर नुकताड झी मराठी कडून प्रदर्शित करण्यात आला सुन ही मालिका स्वातंत्र्यदिन म्हणजेच 15 ऑगस्टपासून (15 August) आठवड्यात सोमवार (Monday) ते शनिवार (Saturday) या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तरी  झी मराठी (Zee Marathi) कडून या मालिकेची जोरदार प्रमोशन सुरु असल्याचं बघायाला मिळत आहे. अभिनेता अंकूश चौधरीने देखील पत्नी  दीप परबची मालिका म्हणून ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या टीझर त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) पेजवर शेअर केला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

‘तू चाल पुढं’ या मालिकेचा टीझर सध्या सोशल मिडीयावर (Social Media) ट्रेंड (Trend) होताना दिसत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकतंच झी मराठीवर प्रदर्शित करण्यात आला असुन अभिनेत्री दीपा परबला मुख्य भुमिकेत बघून प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे.