Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, गरबा क्वीन मालिकेत परतणार
TMKOC (Photo Credit - Twitter)

टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये दयाबेनच्या पुनरागमनाच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. दिशा वाकानी (Disha Vakani) दयाबेनच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे की तिची  जागा दुसरी कोणी घेत आहे हे उघड झाले नाही. जेठालाल आणि दया बेनची लोकप्रिय बाँडिंग अनेकांना आवडली. दिशाने शो सोडल्याबद्दल आपले मौन तोडत तिचे सहकलाकार दिलीप जोशी म्हणाले होते, 'ती परत येईल की नाही, हे फक्त प्रॉडक्शन हाऊसलाच माहीत आहे आणि मला त्यात सहभागी व्हायला आवडणार नाही.' पण आता निर्मात्यांनी एक प्रोमो केला आहे, ज्यामध्ये दयाबाने शोमध्ये पुनरागमन करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दयाबेनच्या पुनरागमनामुळे जेठालाल किती खूश आहेत हे या प्रोममध्ये पाहायला मिळते. जेठालालचा मेहुणा सुंदर स्वतः त्याची बहीण दया हिला अहमदाबादहून मुंबईला घेऊन जात आहे. निर्मात्यांनी शेअर केलेला व्हिडिओ सुंदर लालच्या आवाजाने सुरू होतो. तो जेठालालला फोनवर सांगतो की बहना नक्की येणार. त्याचवेळी व्हिडिओमध्ये दयाबेनची सावली दिसत आहे. (हे देखील वाचा: Shailesh Lodha: 'तारक मेहता' फेम शैलेश लोढा यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष, निर्मात्याने दिले उत्तर)

अभिनेत्री दिशा वाकाणी 2017मध्ये प्रसूती रजेवर गेली होती. मात्र, त्यानंतर ती शोमध्ये परतलीच नाही. शोच्या निर्मात्यांनी तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे आता दिशाऐवजी ‘दया बेन’च्या अवतारात कोणती अभिनेत्री येणार आणि चाहत्यांकडून तिला कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.