The Kapil Sharma Show Promo : कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा (Kapil Sharma) काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत (Ginni Chatrath) विवाहबद्ध झाला. नव्या आयुष्याची सुरुवात आणि नवा कपिल शर्मा शो हा खास योग जुळून आला आहे. कपिल त्याच्या 'द कपिल शर्मा शो' मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाला आहे. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या कपिल शर्मा शो ने प्रेक्षकांना भरभरुन हसवले. या शो मध्ये बॉलिवूडच्या सर्वच स्टार्सने हजेरी लावली होती. त्यामुळे नव्या शो ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पाहा : The Kapil Sharma Show Teaser
या शो चा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रणवीर सिंग, रोहित शेट्टी, सारा अली खान, सलमान खान, सोहेल खान, अरबाज खाल आणि यांचे वडील सलीम खानही दिसत आहेत. हे सर्वच स्टार्स खळखळून हसताना दिसत आहेत. तर तुम्हीही पाहा द कपिल शर्मा शो चा पहिला प्रोमो....
'द कपिल शर्मा शो' च्या या नव्या सीजनमध्ये भारती सिंग, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, सुदेश लहरी, रोशेल राव यांसारखे कॉमेडीयन्स आपल्या कॉमेडीने रंग भरणार आहेत. या शो ची निर्मिती दबंग खान सलमान खान केली आहे. लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
गेल्या काही दिवसांपासून सुनील ग्रोवरसोबतचे भांडण, कपिल शर्मा शोचे बंद होणे त्यानंतर व्यसनाधीन झालेल्या कपिल शर्माचा बॅडपॅच संपला आहे, असे म्हणायला हरकत नाही.