'अग्गंबाई सासूबाई' मालिकेनंतर तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की पुन्हा एकत्र; पहा Video
Tejashree Pradhan and Ashutosh Patki (Photo Credits: Instagram)

'अग्गबाई सासुबाई' (Aggabai Sasubai) या मालिकेतील शुभ्रा-सोहम म्हणजेच तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि आशुतोष पत्की (Ashutosh Patki) यांची जोडी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर त्याचे दुसरे पर्व सुरु झाले. मात्र त्यात शुभ्रा-सोहमची भूमिका वेगळे कलाकार साकारत असल्याने तेजश्री आणि आशुतोष यांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळत नव्हती. परंतु, या दोघांनी एकत्र नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोघांनी एक शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. संरक्षक देवदूत असं या शॉर्टफिल्मचं नाव असून याचे दिग्दर्शन आशुतोषने केले आहे तर तेजश्रीने लेखनाची सुत्रं सांभाळली आहेत. या शॉर्टफिल्म मधून पोलिसांनी सलामी देण्यात आली आहे. (आशुतोष पत्की कडून तेजश्री प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'स्पेशल पोस्ट' आणि 2 खास टीप्स; चाहत्यांमध्ये 'डेटिंग'ची चर्चा)

या लघुपटासंदर्भात आशुतोषने खास पोस्ट केली आहे. यात शूटींग दरम्यानचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, "हा कलाकारांचा प्रामाणिकपणा आहे. सर्व क्रुचे समर्पण आणि निर्मात्यांच्या विश्वासामुळेच प्रोजेक्ट बनतो. आणि हे सगळे माझ्या पाठीशी होते. माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणात त्यांनी विश्वास ठेवला, आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे देशाप्रती आमचे छोटेसे योगदान दिले आहे. तुम्ही ते पाहिले का? नाही तर लिंक बायोमध्ये दिली आहे. तुमच्या अमुल्य प्रतिक्रीयेची वाट पाहत आहोत."

आशुतोष पत्की पोस्ट:

पहा व्हिडिओ: 

तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की या दोघांनी ही फ्लिम सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावर प्रेक्षकांकडून लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर नव्या प्रोजेक्टमध्ये तेजश्री-आशुतोष यांना एकत्र पाहून चाहते सुखावले आहेत.