 
                                                                 सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) त्यातील एका संवादामुळे वादात सापडली होती. मुंबईची भाषा हिंदी असल्याचे चंपक चाचा एका एपिसोडमध्ये बोलताना दाखवण्यात आले होते. या संवादावर आपेक्ष घेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्विट केले होते. त्यानंतर मालिकेचे निर्माते आणि चंपक चाचा ही भूमिका साकारत असलेले अभिनेते अमित भट यांनी माफी मागितली आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी माफीचा एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. ('तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील एका दृश्यावर संतापले अमेय खोपकर; 'मराठी'चे मारक म्हणत दिला 'हा' इशारा)
तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी माफी मागितली आहे. व्हिडिओत ते म्हणतात की, "देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई या सुंदर शहराने सर्वांना सामावून घेतले आहे. त्यामुळे मुंबईची भाषा हिंदी असल्याचे वाक्य मालिकेत वापरण्यात आले होते. तरी देखील चंपक चाचा यांच्या संवादामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही मनापासून माफी मागतो. तारक मेहता ही मालिका सर्व प्रांत, धर्म आणि भाषेचा सन्मान करते."
पहा व्हिडिओ:
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) March 3, 2020
निर्माते असित मोदी यांचे ट्विट:
मुंबई महाराष्ट्र में है और हमारे महाराष्ट्र की राजभाषा भाषा मराठी ही है. इस में कोई डाउट नहीं है. मैं भारतीय हूँ . महाराष्ट्रियन हूँ और गुजराती भी हूँ. सारी भारतीय भाषाओं का सम्मान करता हूँ. 🙏🏻🙏🏻 जय हिन्द,
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) March 3, 2020
मुंबईची भाषा हिंदी आहे, या संवादामुळे अमेय खोपकर चांगलेच संतापले होते. 'यांची मस्ती उतरवावीच लागेल,' असा इशारा देत अमेय खोपकर यांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी मालिकेतील मराठी कलाकारांसह सर्वांचाच चांगला समाचार घेतला होता. त्यामुळे सब टीव्ही, मालिका यात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे होते. मात्र हे प्रकरण अधिक न ताणता मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागत या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
