तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta ka Ulta Chashma) या मालिकेत दयाबेनचे पात्र साकारत दिशा वकानी (Disha Vakani) हिने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. मात्र गरोदरपणामुळे दिशाने जी काही सुट्टी घेतली कि तेव्हापासून मागील दोन वर्ष शो दयाबेन शिवायच सुरु आहे. दयाच्या खास आवाजात टप्पू के 'पपा ला हाक मारणे, गरबा खेळणे हे सारे काही प्रेक्षक मिस करत असताना या सर्व चाहत्यांसाठी खुशखबर समोर येत आहे. स्पॉटबॉय वेबसाईटच्या वृत्तानुसार, येत्या नवरात्री (Navratri) विशेष भागातूनच दया मालिकेत पुन्हा एंट्री घेणार आहे. मागील काही काळापासून सतत सिरियलचे निर्माते आसित मोदी (Asit Modi) आणि दिशा वकानी यांच्यात कामाच्या अटींवरून मतभेद असल्याचे वृत्त समोर येत होते, मात्र आता अखेरीस या दोघांचे एक मत होऊन दिशाने निर्मात्यांच्या अटींवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
दिशाने सिरियलच्या सुरुवातीपासून दया बेन ही भूमिका पार पाडली होती, लग्नानंतर तिने गरोदर असल्याने कार्यक्रमातून सुट्टी घेतली होती. मध्यंतरी दोन तीन वेळा अगदी काही वेळासाठी दिशा पुन्हा सीरियल मध्ये दिसली होती, मात्र त्यानंतर प्रेक्षकांना दिशाच्या वापसीचे काहीच संकेत मिळत नव्हते, याउलट तिच्या जागी नवीन अभिनेत्री येणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले होते. यासाठी अमी त्रिवेदी, विभूती शर्मा यांची नवे देखील चर्चेत होती. मात्र आता दिशाच्या वापसीने पुन्हा सिरीयल मध्ये रंगत येणार हे मात्र नक्की आहे.
दरम्यान दिशाचे चाहतेच नव्हे तर, मालिकेतील अन्य पात्र देखील तिच्या वापसीची वाट पाहत आहेत. जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी देखील दिशानेच हे पात्र मोठे केले आहे असं म्हणत तिच्या वापसीची इच्छा व्यक्त केली होती. या मालिकेचा चाहते वर्ग प्रचंड असून त्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळे फॅन ग्रुप्स देखील बनवले आहेत. केवळ मालिकाच नव्हे तर या मालिकेतली पात्र म्हणजे जेठालाल, टप्पू, भिडे, दयाभाभी यांनी देखील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे