Taarak Mehta Ka Ooltah Chashmah चा निर्माता Asit Modi सह टीमच्या दोन सदस्यांवर लैंगिक छळाचा आरोप; मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा
TMKOC Producer Asit Kumarr Modi (Photo Credits: Facebook)

प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या शोच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप होत आहेत. आता शोच्या एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी मंगळवारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा निर्माता असित कुमार मोदी, ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतीन बजाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पवई पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 354 आणि 509 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी) नुसार एफआयआर नोंदवला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

गेल्या महिन्यात या अभिनेत्रीने निर्माता असित कुमार मोदी आणि इतर दोन क्रू मेंबर्सविरोधात तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी सांगितले की, ‘तारक मेहता का उल्टा चष्माचा निर्माता असित कुमार मोदी आणि त्याच्या टीममधील इतर दोन सदस्यांविरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात पवई पोलिसांनी अभिनेत्रीचे निवेदन  नोंदवले आहे. पोलीस लवकरच असित कुमार मोदी आणि इतरांचे निवेदन नोंदवणार आहेत व यासाठी त्यांना समन्स बजावण्यात येईल.’

दुसरीकडे, असित मोदी याने हे आरोप फेटाळून लावले असून, ते निराधार असल्याचे म्हटले आहे. आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करण्याचा दावाही त्याने केला आहे. प्रॉडक्शन हाऊससोबतचा अभिनेत्रीचा करार संपुष्टात आल्याने तिने सूडबुद्धी हे आरोप केले असल्याचे तीनही आरोपींचे म्हणणे आहे. तिघांनी अधिकृत निवेदन जारी करून सर्व आरोप नाकारले आहेत. (हेही वाचा: The Kapil Sharma Show फेम Tirthanand Rao यांनी सोशल मीडियावर लाईव्ह संवादादरम्यान केला आत्महत्येचा प्रयत्न; या महिलेवर केला गंभीर आरोप)

दरम्यान, काही वेळापूर्वी अभिनेत्रीने लोकप्रिय सिटकॉम तारक मेहता का उल्टा चष्मा सोडला होता. 15 वर्षांनंतर शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने शोचा निर्माता असित कुमार मोदी याच्यावर मानसिक आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अभिनेत्रीकडून लेखी तक्रार मिळाली होती.