Taarak Mehta फेम सोनू हिचा बिकनितील लूक सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
Nidhi Bhanushali (Photo Credits-Instagram)

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  मधील फेम सोनू उर्फ निधी भानूशाली (Nidhi Bhanushali) ही सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चेत आहे. कारण तिचा सोशल मीडियातील इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात तिने बिकनी घातली आहे. निधी हिने तारक मेहता शो मधून 2019 रोजी एक्झिट घेतली होती. त्यानंतर तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे निधी हिने म्हटले होते. पण निधी सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये फारच चर्चेत राहत आहे.

जे लोक निधी भानुशाली हिला सोशल मीडियात फॉलो करतात त्यांना माहिती असेल की, तिला निसर्ग खुप आवडतो. निधी ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक्ष क्षण उत्तमपणे जगण्यावर विश्वास ठेवते. अभिनेत्रीचे काही व्हिडिओ असे आहेत ज्यामध्ये रियल लाइफमध्ये एकदम वेगळी दिसून येते. चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, सोनू अगदी बदलली आहे.(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah कार्यक्रमात 'दयाबेन' ची भुमिका साकारण्याबद्दल दिव्यांका त्रिपाठीने दिले 'हे' स्पष्टीकरण)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निधी हिने ब्लू रंगाची बिकनी घातली आहे. त्यानंतर ती पाण्यात उतरुन पोहण्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. निधी हिचा व्हिडिओ सोशल मीडियात हा तुफान व्हायरल होत आहे. यावर सातत्याने चाहत्यांकडून कमेंट्स केल्या जात आहेत.