Sushant Singh Quits Savdhaan India For Protesting Against CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 (Citizen Amendment Act 2019) याला विरोध दर्शवणारे जामिया मिलिया इस्लामियाचे विद्यार्थी व पोलिसांनी त्यांच्यावर केलेले हल्ले, यासंबंधित सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार वादाला तोंड फुटले आहे. एंटरटेनमेंट विश्वातील अनेक कलाकारांनी याबद्दल भाष्य करत त्यांचे मत मांडले आहे. स्वरा भास्कर, तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी, रिचा चड्ढा आणि इतरही अनेक सेलिब्रिटींचा यामध्ये समावेश आहे. सावधान इंडिया फेम सुशांत सिंग यांनीही हिंसक कृत्याचा निषेध केला आणि त्याविरोधात आवाज उठविला.
परंतु, त्याने नुकत्याच केलेल्या ट्विटमधून एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सुशांतने चाहत्यांना सावधान इंडियामधून अचानक बाहेर पडण्याविषयी माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे या ट्विटमध्ये सुशांतने आपल्या बाहेर पडण्यामागील कारण असे म्हटले आहे की तो CAA 2019 विरुद्ध चालू असलेल्या आंदोलनांमध्ये सक्रियपणे भाग घेत आहे. सोशल मीडियावर हा संदेश पसरताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे. त्यापैकी बर्याच जणांनी त्याच्या या निर्णयाला दर्शविला आहे.
एका नेटकाऱ्याने सुद्धांतच्या ट्विटवर भाष्य करत म्हटले आहे की सावधान इंडिया टीम भारतीय संविधानाची काळजी घेत नाही. काही इतर नेटकऱ्यांनी तर सुशांतच्या साहसाला दाद देत त्याचे कौतुक केले आहे व त्याला रिअल हिरो म्हटले आहे.
सुशांतने CAA 2019 च्या विरोधात बोलण्याची किंमत मोजली आहे असं बर्याचजणांचे मत आहे. तसेच नऊ वर्षाच्या ब्रेकनंतर अलीकडेच सुशांतने सावधवन इंडिया या शोमध्ये पुन्हा एन्ट्री केली होती. यापूर्वी शोचे होस्टिंग टिस्का चोप्रा आणि आशुतोष राणा यांनी केले आहे.