Bollywood Actor Farhan Akhtar on CAA: फरहान अख्तर हा बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल आपली प्रतिक्रिया मंडळी आहे. CAA विरोधात देशभरात अनेक निदर्शने होत आहेत आणि दिल्लीतील जामिया मिलिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांकडून हिंसक आंदालनं देखील करण्यात येत आहेत. आयुष्मान खुराना, राजकुमार राव, परिणीती चोपडा, आलिया भट्ट, अनुराग कश्यप यासारख्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी याविरुद्ध आवाज उठवत चिंता व्यक्त केली. फरहान अख्तर याने आपल्या एका ट्विटमध्ये तो 19 तारखेला मुंबईत होणाऱ्या CAA आणि NRC विरोधात आंदोलनात सामील होणार असल्याचे नमूद केले होते आणि आता त्याच्या या ट्विटने त्याला अडचणीत आणले आहे.
फरहान अख्तर याने आज सकाळी ट्विट करत लिहिले की, “हा निषेध का महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल काय माहित असणे आवश्यक आहे ते इथे लिहिले आहे. 19 तारखेला मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात भेटू. फक्त सोशल मीडियावर निषेध करण्याची वेळ आता संपली आहे."
Here’s what you need to know about why these protests are important. See you on the 19th at August Kranti Maidan, Mumbai. The time to protest on social media alone is over. pic.twitter.com/lwkyMCHk2v
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) December 18, 2019
फरहानच्या या ट्विटवर लगेचच वरिष्ठ आयपीएस अधिकारी संदीप मित्तल यांनी उत्तर देत, फरहानच्या निदर्शनास आणून दिले आहे की त्याने कायदा मोडला आहे. तसेच मुंबई पोलिस आणि भारतीय तपास यंत्रणेला त्यांनी टॅग करत फरहानवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
You also need to know that you ' ve committed an Offence u/s 121 of Indian Penal Code & it is not unintentional. @MumbaiPolice & @NIA_India are you listening.Please think of the Nation that is giving you everything in your Life.
Understand the Law👉( https://t.co/DK3hDYe9e2 )
— Sandeep Mittal, IPS (@smittal_ips) December 18, 2019
आयपीएस अधिकारी संदीप मित्तल यांनी दंड संहितेच्या कलम 121 मध्ये स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की तुम्ही भारतीय दंड संहितेचा 121 कलमांतर्गत गुन्हा केला आहे आणि तो नकळत नाही. @MumbaiPolice आणि @NIA_India तुम्ही ऐकत आहात ना? कृपया आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणार्या राष्ट्राचा विचार करा. कायदा समजून घ्या. ”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संदीप मित्तल यांनी जामिया मिलिया विद्यापीठ परिसरातील हिंसक आंदोलनाचा निषेध करत जावेद अख्तर यांच्या ट्विटला प्रत्युत्तरही दिले होते.