कलर्स मराठी (Colors Marathi) वरील सूर नवा ध्यास नवा (Sur Nava Dhyas Nava) कार्यक्रमाचे नवे पर्व येत्या काहीच दिवसांवर येऊ घातले आहे तरी अजूनही यापूर्वीच्या छोटे सुरवीर पर्वाची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगत आहे. खरंतर यामागे कारणही तसंच खास आहे. मागील काही दिवसात तुम्ही कलर्स वाहिनीवर स्वामिनी (Swamini) या नव्या मालिकेचा प्रोमो पाहिला असेल, यामधील पेशव्यांची सुनबाई हे पात्र साकारणारी चिमुकली पाहताक्षणी सर्वांचे लक्ष वेधून घेते. ही बाल कलाकार म्हणजे दुसरी कोणी नसून सूर नवा ध्यास नवा मधील नटखट स्पर्धक सृष्टी पगारे (Srushti Pagare) आहे. या मालिकेतून सृष्टी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
सुरु नवा ध्यास नवा शो मध्ये सृष्टीने बहीण राशी पगारे सोबत सहभाग घेतला होता. यावेळी प्रत्येक गाण्यात तिच्या नटखट अदा आणि निरागसपणा परीक्षकांसह प्रेक्षकांची ही वाहवा मिळवायचा. अवघ्या काहीच दिवसात ती सृष्टिसेना म्हणून ओळखली जाउ लागली. सृष्टीच्या अभिनयाची आवड आणि कसब या शो दरम्यान तिने केलेल्या प्रत्येक सादरीकरणातून प्रकर्षाने दिसून येत होते. आणि याच बळावर स्वामिनी या मालिकेसाठी सुद्धा तिची निवड झाली आहे.
सूर नवा ध्यास नवा सृष्टी पगारे
दरम्यान, स्वामिनी मालिका कलर्स मराठीवर येत्या काहीच दिवसात पाहायला मिळणार आहे. यामध्ये पेशवेकालीन कथानक मांडले जाणार आहे. आतापासूनच या विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. (हिंदी चित्रपटांमुळे ‘ये रे ये रे पैसा 2’ ला थिएटर्स मिळणे मुश्कील; प्रसाद ओकने सोशल मिडीयावर व्यक्त केला राग)
पहा स्वामिनी मालिकेचा प्रोमो
याशिवाय येत्या काहीच दिवसात सुरु नवा ध्यास नवा शो चे देखील नवे पर्व सुरु होणार आहे. यंदा या शो साठी कोणतीही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही.