Super Dancer 4 मधून शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सोनाली बेंद्रे घेणार तिची जागा?
Photo Credits : Instagram

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या तिचा नवरा राज कुंद्रा याच्या कारणामुळे सुरु असलेल्या प्रकरणावरुन चर्चेचा विषय ठरत आहे. राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी ही आपला डान्स रिअॅलिटी शो सुपर डांन्सर मधून गायब झाल्याचे दिसून आले आहे. राज कुंद्राच्या प्रकरणानंतरच शिल्पा शेट्टी शो पासून दूर झाली आहे.

शिल्पा शेट्टी शिवाय शो झाल्याचा हा तिसरा आठवडा आहे. अशातच अशी चर्चा सुरु आहे की, सध्याच्या प्रकरणामुळे अभिनेत्रीने शो ला गुडबाय केले आहे. शिल्पा शेट्टी नसल्याने या आठवड्यात निर्मात्यांनी शो मध्ये दोन स्पेशल जज आणले होते. यामध्ये मौसमी चटर्जी आणि सोनाली बेंद्रे यांचा समावेश आहे. शो मध्ये पोहचलेल्या सोनाली बेंद्रे आणि मौसमी चटर्जी आपल्या सिनेमासंदर्भातील किस्से शेअर करताना दिसून आले.(Raj Kundra Porn Film Case: मुंबई पोलिस क्राईम ब्रांचच्या Property Cell कडून आज Sherlyn Chopra ला जबाब नोंदणीसाठी हजर राहण्यासाठी समन्स)

शो मध्ये सोनाली बेंद्रे ही कंटेस्टेंट फ्लोरिना हिच्यासाठी गिफ्ट घेऊन पोहचली होती. अमित, संचित आणि पृथ्वीराजने सोनाली बेंद्रेच्या गाण्यावर शानदार परफॉर्मेन्स सुद्धा दिला होता. तो पाहून अभिनेत्री भावूक होण्यासह आनंदित सुद्धा झाली होती. शिल्पा शेट्टीच्या अनुपस्थिती पूर्ण करण्यासाठी मेकर्स प्रत्येक आठवड्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजला बोलावून तिची कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त गीता कपूर आणि अनुराग बासू हे डान्स शो चे मुख्य जज होते. मात्र गेल्याच आठवड्यात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या कार्यक्रमात स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाले होते.