Sugandha Mishra Mehendi Ceremony Photos: अभिनेत्री सुगंधा मिश्रा लवकरच अडकणार विवाहबंधनात, मेहंदी सेरेमनीचे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल
Sungandha Mishra Mehendi Ceremony (Photo Credits: Instagram)

हिंदी टेलिव्हिजन ची सर्वोत्कृष्ट कॉमेडियन सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) आज म्हणजेच 26 एप्रिलला अभिनेता तसेच विनोदी कलाकार संकेत भोसले (Sanket Bhosale) याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सुगंधाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या मेहंदीचे फोटोज शेअर केले आहेत. तिच्या आणि संकेतच्या घरी लग्नाची लगबग असून अगदी थोडक्यात आणि साधेपणाने कोरोनाचे नियम पाळून हा लग्नसोहळा पार पडत आहे. शनिवारी तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. 'मेहंदी की रात' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.

पंजाबमधील जालंदरमध्ये सुंगधा आणि संकेत यांच्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत.

अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सुगंधा आणि संकेतचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

दरम्यान संकेत भोसले ने ही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्याचा आणि सुगंधाचा मेहंदी सेरेमनी दरम्यानचा व्हिडिओ शेअर केला आहे.हेदेखील वाचा- Radhe Song Seeti Maar: 'राधे' सिनेमातील Salman Khan, Disha Patani यांच्या धमाकेदार अंदाजातील 'सीटी मार' गाणं प्रदर्शित (Watch Video)

सुगंधा आणि संकेत अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तसचं गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सुगंधा आणि संकेत दोघांनी अनेक कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'द कपील शर्मा' या शोमध्ये संकेत संजय दत्तच्या रुपात चाहत्यांचं मनोरंजन करायचा. तर 'द कपील शर्मा' या शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत सुगंधानेदेखील प्रेक्षकांना पोटभर हसवलं आहे.