हिट मराठी मालिकांच्या यादीत बहुदा प्रथम स्थानी असेल असे नाव म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे (Shriyut Gangadhar Tipre). आता या लॉकडाउन (Lockdown) आबा टिपरे यांचे कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजत आहे. झी मराठी वरच येत्या सोमवार म्हणजेच 15 जून पासून श्रीयुत गंगाधर टिपरे यान मालिकेचे पुनःप्रक्षेपण केले जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेने सामान्य माणसाचं आयुष्य टेलिव्हिजनवर आणत अत्यंत भावनिक पण तितक्याच मजेशीर रूपात मांडले होते. आता या कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात लोकं घरी बसू वैतागली असताना त्यांची ही आवडती मालिका पुन्हा एकदा त्यांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. स्वप्नील जोशी ला उत्तर रामायणमध्ये 'कुश' ची भूमिका कशी मिळाली? त्याच्याकडूनच 'इथे' ऐका सारे किस्से आणि खास गोष्टी (Watch Video)
श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका 2001 -2005 या चार वर्षात प्रसारित झाली होती. 2 नोव्हेंबर 2001 पासून सुरु झालेला हा प्रवास 165 भागांनंतर 7 जानेवारी, 2005 रोजी संपला होता. अवघ्या चार वर्षात या मालिकेने मराठी प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. आता पुन्हा एकदा ही ,मालिका आपल्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम, रेश्मा नाईक इत्यादी कलाकारांनी या मालिकेत भूमिका साकारल्या होत्या.
या मालिकेच्या यशाचे कारण सांगताना एका मुलाखतीत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले होते की, आपल्यासारखेच कोणीतरी चक्क टीव्हीवर पाहायला मिळत आहेत या भावनेने प्रेक्षक या मालिकेकडे खेचले जात होते. ही मालिका पाणी घालून न वाढवता त्यात उत्तम दर्जापूर्ण कंटेंट वर भर देण्यात आला होता, म्हणूनच प्रेक्षकांना याबाबत आजही आकर्षण आहे.
मागील काही काळात जय मल्हार, स्वराज्यरक्षक संभाजी, होणार सून मी घरची या मालिकांची सुद्धा टीव्हीहीवर पुन्हा एंट्री झाली आहे आता या एव्हरग्रीन टिपरे कुटुंबाची सुद्धा रीएंट्री तितकीच दमदार होईल यात काही शंका नाही.