टेलिव्हिजन अभिनेत्री सारा खान (Sara Khan) हिने काही दिवसांपुर्वीच सोशल मीडियावर अशी एक पोस्ट शेअर केली आहे की. त्यामुळे तिला सध्या ट्रोल करण्यात येत आहे. स्टार प्लस चॅनलवरील शो 'बिदाई... सपना बाबुल का' (Bidaai...Sapna Babul Ka) यामधून प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळेच बिदाई या कार्यक्रमाबद्दल सांगण्यासाठी तिने हा फोटो पोस्ट केला होता. परंतु तिच्या फोटोतील लुकमुळे ती अजूनच हॉट दिसून आली.
सारा खानेने पोस्ट केलेल्या फोटोवर तिला नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यावेळी साराने ओठांची सर्जरी केल्याचा खुलासा केला आहे. यामुळे साराला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यावर साराने ही प्रतिउत्तर दिले आहे. तिने असे म्हटले आहे की, मी या सर्व कमेंट्सचा आनंद घेत असून मला ही हसायला येत आहे. नापसंद करणारे लोक असा प्रकार करतात आणि मला ट्रोल होण्याची सवय लागली आहे. तसेच मी ओठांची सर्जरी करणे हे चुकीचे ठरले आहे.
दरम्यान साराने नेटकऱ्यांना असे ही सांगितले की, ज्या नेटकऱ्यांना मी ओठांची सर्जरी केल्याचे चुकीचे ठरविले आहे, त्यांना खरे सत्य माहिती नाही. तसेच खरंतर हे एक लिप फिलर आहे. मात्र ओठांची सर्जरी केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.