Rupali Ganguly Tested COVID Positive: 'अनुपमा' फेम रुपाली गांगुली हिला कोरोनाची लागण, 'ये क्या हुआ..' असे म्हणत सोशल मिडियाद्वारे दिली माहिती
Rupali Ganguly (Photo Credits: Instagram)

'अनुपमा' (Anupama) फेम अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिला कोरोनाची लागण झाली आहे. रुपालीने सोशल मिडियावरून याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत चित्रपटांसह मालिकेतीलही अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आढळले आहेत. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मराठी मालिका 'आई कुठे काय करते' ही हिंदीत 'अनुपमा' या नावाने बनविण्यात आली आहे. यात अनुपमाचे पात्र साकारणारी रुपाली गांगुली हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचे लोकप्रिय गाणे 'ये क्या हुआ, कैसे हुआ' या गाण्यामधून हटके अंदाजा आपण कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

अभिनेत्री रुपाली गांगुली हिने "अशा पद्धतीने पॉझिटिव्ह नव्हतं व्हायचं. ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, जब हुआ, तब हुआ छोडो ये ना पुछो…सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि माझ्यावर, माझ्या परिवारावर, अनुपमा परिवारावर प्रेमाचा वर्षाव करत राहा." अशी पोस्ट इन्स्टाग्राम अकाउंटवर करत आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.हेदेखील वाचा- Alia Bhatt Tested COVID-19 Positive: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; सोशल मीडियावर दिली माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

ही लागण कशी, कधी, कुठे झाली हे तिला माहित नसल्याचंही तिने आगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. सगळी काळजी घेऊनही कसा काय झाला कोणास ठाऊक असंही ती पुढे म्हणते. ‘अनुपमा’ मालिकेच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फक्त रुपालीच नाही तर या मालिकेतला अजून एक अभिनेता आशिष मल्होत्रा यालाही करोनाची लागण झाल्याचं कळत आहे.

रुपालीला करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत आणि तिची प्रकृती उत्तम असल्याचं टीमकडून सांगण्यात आलं. तसंच ती सर्व प्रकारची काळजी घेत होम क्वारंटाईन असल्याचंही सांगण्यात आलं आहे. महानगरपालिकेला याबाबत माहिती देण्यात आली असून सेटचं सॅनिटायझेशनही करण्यात आलं आहे.

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, आलिया भट, आमिर खान, आर माधवन, मिलिंद सोमण, परेश रावल अशा अनेक दिग्गज कलाकारांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.