Rupali Bhosale | Photo Credits: Instagram

आई कुठे काय करते आणि बिग बॉस मराठी 2 फेम अभिनेत्री रूपाली भोसलेने (Rupali Bhosle) नुकताच तिचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. रूपालीचा जुना फोटो नॉन ग्लॅमरस आणि पटकन ओळखू न येणारा असला तरीही ती पारंपारिक साडीच्या लूक मध्ये सुंदर दिसत आहे. तिच्या चेहर्‍यावरचं समाधान आणि साधेपणा बरंच काही सांगून जात आहे. रूपालीने हा फोटो इंस्टाग्राम वर शेअर करत ' हे रूपाली मी तुला मिस करत आहे.' असं म्हटलं आहे.

रूपाली ने जुना आणि नवा फोटो पोस्ट करत ही मुलगी मोठा प्रवास करून आली आहे. माझ्यावर विश्वास ठेवलेल्या आणि न ठेवलेल्या सार्‍यांना धन्यवाद. माझ्यावर विश्वास ठेवलेली व्यक्ती मीच होते आणि लक्षात ठेवा तिच मोठी गोष्ट आहे. खूप अडचणी आल्या, चढ उतार आले पण कशाही बद्दल शल्य नाही. आता गोष्टी सारख्याच नाहीत पण लढण्याचं स्पिरीट आहे. अशा आशयाची तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

सध्या रूपाली भोसले स्टार प्रवाह वर 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये 'संजना' हे ग्रे शेड पात्र साकारत आहे. या मालिकेच्या तिच्या कामालाही रसिकांची पावती मिळत आहे. सध्या राज्यातील कोरोना संकटामुळे मागील दीड -दोन महिन्यांपासून सारे टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकार इतर राज्यांत शूट करत आहेत.