Ratris Khel Chale 3 Teaser: सावधान! अण्णा नाईक परत येतायत, 'रात्रीस खेळ चाले 3' चा भयभीत करणारा टीजर आला समोर, Watch Video
Ratris Khel Chale 3 Teaser (Photo Credits: Instagram)

घराघरात पोहोचलेली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले 2' ने 29 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना सर्व प्रेक्षक प्रचंड मिस करत होते. विशेषत: या मालिकेतील अण्णा नाईक (Anna Naik) आणि शेवंता (Shevanta) हे पात्रांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. अण्णा नाईकांचा दरारा आणि शेवंताची मादक अदा पाहून या मालिकेचे चाहत्यांना भावली. त्यामुळे ही मालिका पुन्हा सुरु करा असे अनेक चाहते मागणी करत होते. त्याच दरम्यान आज झी मराठीवर 'रात्रीस खेळ चाले 3' (Ratris Khel Chale 3) या मालिकेचा टीजर समोर आला आहे. हा टीजर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या टीजर पाहताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला असेल. या टीजरमध्ये अण्णा नाईकांचे भयभीत करणारे घारे डोळे पाहून आणि दिव्याचा अचानक नाहीसा होणारा प्रकाश पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकेल.हेदेखील वाचा- रात्रीस खेळ चाले 2 मध्ये नाईक वाड्यात वाजणार अण्णा आणि शेवंताच्या लग्नाचे सनई-चौघडे, See Photos

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

ही मालिका कधी आणि केव्हा सुरु होणार याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. शिवाय ही मालिका कोणत्या मालिकेची जागा घेणार, कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे देखील समोर आलेले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल.

तसेच टीजरमध्ये अण्णा नाईकच दिसत आहे त्यामुळे यात माधव अभ्यंग असणार हे जरी निश्चित झाले असले तरीही शेवंता पात्र साकारलेली अपूर्वा नेमळेकर देखील या मालिकेत दिसणार का?, आणखी कोणकोणती पात्र असणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल. मात्र रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका आता पुन्हा पाहायला मिळणार या कल्पनेनेच चाहते खूश झाले आहेत.