Ramayana: रामायणात रामाचे पात्र साकारणारे अरुण गोविल म्हणतात 'हा' सीन शूट करणे होते सर्वात कठीण
Arun Govil Ramayan's Ram (Photo Credits: Twitter)

लॉक डाऊन (Lockdown) काळात सर्वांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन वाहिनीने आपल्या गाजलेल्या मालिका म्हणजेच रामायण, उत्तर रामायण, महाभारत पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या काहीच दिवसात या मालिकांनी आजवरचे मोठे रेकॉर्ड मोडून काढत व्ह्यूअरशिप मिळवली. त्यातही रामायण (Ramayana) मालिका तर जगातील मोठमोठया शोजना मागे टाकत सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली. अलीकडेच उत्तर रामायणाचा (Uttar Ramayan) सुद्धा शेवटचा भाग प्रदर्शित झाला त्यावेळी अनेक ट्विटर युजर्सनी #UttarRamayanFinale, #ThankYouRamayan असे हॅशटॅग वापरून या मालिकेच्या टीमचे आभार मानले. याच निमित्ताने रामायणात रामाचे मुख्य पात्र साकारणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांनी सुद्धा ट्विटरवर आपल्या फॅन्ससोबत संवाद साधला. यावेळी एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत त्यांनी रामायणातील सर्वात कठीण सीन कोणता वाटला याचा उलगडा केला. DD वरील उत्तर रामायण आणि श्रीकृष्ण मालिकांमध्ये 'स्वप्नील जोशी 'असा' ठरला एक समान धागा

रामायणातील राम म्हणजेच अरुण गोविल यांनी नुकतेच ट्विटर वर #AskArun हे सेशन घेतले होते. आजवर अनेक सेलिब्रिटींनी ही सेशन केले आहे यामध्ये फॅन्सच्या वेगेवेगळ्या प्रश्नांना सेलिब्रिटी थेट उत्तर देतात. आता अर्थात थेट रामाशी बोलायला मिळणार म्ह्णून अनेकांनी या पोस्ट वर प्रश्न विचारले होते. त्यात एका चाहत्याने अरुण यांना तुम्हाला रामायणात चित्रीकरण करताना कोणता सीन सर्वात कठीण वाटला असे विचारले, यावर उत्तर देताना अरुण यांनी राजा दशरथ यांच्या म्हणजेच रामाच्या पित्याच्या मृत्यूची बातमी कळते तो सीन असे उत्तर दिले. रामायण कार्यक्रम दूरदर्शन नंतर आता 'या' चॅनलवर प्रेक्षकांना पाहता येणार

अरुण गोविल ट्विट

दरम्यान, रामायणाचे पुनःप्रक्षेपण सुरु झाल्यापासून या मालिकेच्या कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स पुन्हा चर्चेत आले आहे. मग ते अरुण गोविल असो, सीता माता साकारणाऱ्या दीपिका चिखलीया असो किंवा लक्ष्मणाच्या भूमिकेतील सुनील लहरी असो अनेकांच्या फोटो, पोस्ट वर चाहत्यांचे लक्ष लागून असते. एकीकडे रामायण हिट झाल्यावर आणि आता लॉक डाऊन सुद्धा वाढल्यावर दूरदर्शनवर श्रीकृष्ण ही मालिका सुद्धा आज 3 मे पासून रोजरात्री 9  वाजता दाखवली जाणार आहे.