Ram Kapoor ने घेतला कोरोनाचा डोस, लस घेताना अभिनेत्याने केले असे काही जे पाहून नर्ससह डॉक्टरांचेही झाले मनोरंजन, Watch Video
Ram Kapoor (Photo Credits: Instagram)

अनेक मराठी तसेच हिंदी कलाकारांना कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे. सिनेसृष्टीसह मालिकांमधील कलाकारांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत कलाकार आर्वजून पुढाकार घेत आहेत. यात आतापर्यंत सलमान खान, मलायका अरोरा, अमिताभ बच्चन यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्याचबरोबर आता अभिनेता राम कपूर याने देखील कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. मात्र त्याचा कोरोनाचा डोस घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही लस घेताना राम कपूरने (Ram Kapoor) केलेल्या मजेशीर अभिनयाने तेथील नर्स तसेच डॉक्टरांचे चांगलेच मनोरंजन केले.

राम कपूर या व्हिडिओमध्ये नर्स जेव्हा त्याच्या हातावर लस देण्यासाठी पुढे येते तेव्हा राम कपूर जोरजोरात ओरडताना दिसत आहे. त्यामुळे नर्सला देखील आपले हसू आवरले नाही. रामच्या या मजेशीर अंदाजामुळे मात्र नर्सची चांगलीच पंचाईत झाली होती.हेदेखील वाचा- Rupali Ganguly Tested COVID Positive: 'अनुपमा' फेम रुपाली गांगुली हिला कोरोनाची लागण, 'ये क्या हुआ..' असे म्हणत सोशल मिडियाद्वारे दिली माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor)

मात्र जेव्हा नर्स त्याला लस देते तेव्हा तो जोरजोरात हसताना दिसत आहे. या व्हिडिओ शेअर करुन "आपल्या सर्वांसाठी अहोरात्र कष्ट करणा-या फ्रंट लाईन वर्कर्सच्या चेह-यावर थोडंसं हसू आणण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून केला आहे" असे कॅप्शन राम कपूरने आपल्या पोस्टखाली लिहिले आहे.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या या कॅप्शनवर त्याची पत्नी गौतमी कपूरने देखील त्याचे कौतुक केले आहे. राम कपूरची गाजलेली लोकप्रिय मालिका 'बडे अच्छे लगते हैं' मध्ये देखील राम कपूर इंजेक्शन खूप घाबरत असल्याचे दाखवले होते. त्यामुळे त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी 'तुम्ही ख-याखु-या लाईफमध्येही इंजेक्शनला घाबरता का' असा सवाल केला आहे.

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सिनेमा, मालिकांच्या सेटवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मास्क लावणे, सॅनिटायजर लावणे, सेट सॅनिटाईज करणे यांसारखी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत अनेक कलाकार पुढे होऊन कोरोनाची लस घेत आहेत.