'Dance Deewane 3' च्या सेटवर कोरोनाचा धुमाकूळ! परीक्षक Dharmesh नंतर सूत्रसंचालक Raghav Juyal ला कोरोनाची लागण
Raghav Juyal (Photo Credits: Instagram)

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने 3' (Dance Deewane 3) च्या सेटवर कोरोनाचे वादळ घोंगावत आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवरील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात या शो चा परीक्षक धर्मेश सर याला देखील कोरोना झाल्याचे आढळून आले होते. त्यापाठोपाठ आता या शोचा सूत्रसंचालक राघव जुयाल (Raghav Juyal) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. स्वत: राघवने आपल्या सोशल अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.

राघवने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहलं आहे, ‘ताप आणि खोकला आल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करून घेतली, आणि आता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझा संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्या आणि कोरोना चाचणी करून घ्या. सर्व प्रोटोकॉल पाळा. सतर्क राहा आणि सुरक्षित राहा’. अशा आशयाची पोस्ट राघवने केली आहे. राघवने ही पोस्ट केल्यानंतर चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. आणि काळजी घेण्यास ही सांगत आहेत.हेदेखील वाचा- Dance Deewane 3 च्या सेट वर 18 क्रू मेंबर्स नंतर आता जज Dharmesh Yelande आणि निर्माते Arvind Rao देखील कोविड पॉझिटीव्ह

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

डान्स दिवाने मध्ये सध्या कोरिओग्राफर तुषार आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित परीक्षक म्हणून आहेत. तर दुसरीकडे यातील तिसरा परीक्षक धर्मेश येलांडे हा कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या जागी कोरिओग्राफर पुनीत ला परीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.

या शोमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार येऊन गेले आहेत. यात राघवचे सूत्रसंचालन सर्वांना खिळवून ठेवते. त्याचे नृत्य आणि त्याचा विनोदातील सेन्स ऑफ ह्युमर सर्वांना आवडतो. त्याला कोरोना झाल्याची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.