
टेलिव्हिजन अभिनेता पर्ल वी पुरी याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण थंड होत नाही अशातच आणखी एक टीव्ही अभिनेत्यावर छेडछाडीचा आरोप लावला आहे. टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी' फेम अभिनेता प्राचीन चौहान (Pracheen Chauhan) याला मुंबईतील मालाड ईस्ट पोलिसांनी छेडछाडीच्या आरोपाखाली अटक केली आहे. प्राचीन याच्यावर भारतीय कायद्यानुसार कलम 354,342,323,506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने मलाड पोलीस स्थानकात प्राचीन याच्या विरोधात तक्रार केली होती.
प्राचीन चौहान हा टीव्ही डेब्यू स्टार प्लस वरील शो कसौटी जिंदगी मधील आहे. प्राचीन चौहा या मालिकेत सुब्रतो बासुची भुमिका साकारत आहे. या व्यतिरिक्त प्राचीन याने अन्य काही मालिकेत सुद्धा भुमिका साकारली होती. मसलन कुछ झुकीं पलके, सिंदूर तेरे नाम का, सात फेरे आणि पिता के चरणों में स्वर्ग मध्ये सुद्धा दिसून आला होता.(अभिनेत्री Yami Gautam ला ED चा समन्स; पुढील आठवड्यात कार्यालयात हजर राहण्याचे आदेश)
सध्या प्राचीन युट्यूबवर शिट्टी आयडियाज ट्रेंडिंग वेब सीरिजमध्ये छवि मित्तल आणि पूजा गौर सोबत झळकणार आहे. त्याची अभिमन्यु ही भुमिका लोकांच्या पसंदीस पडत आहे. दरम्यान, पर्ल वी पुरी याला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली POCSO कायद्याअंतर्गत अटक केली होती. पर्ल सध्या जामिनावर बाहेर आहे. तसेच यह रिश्ता मध्ये नैतिकची भुमिका साकारणारा अभिनेता करण मेहरा याच्यावर त्याची पत्नी निशा रावल हिने सुद्धा तिच्यासोबत मारहाण केल्याचा गंभीर आरोप लावला होता.