लोकप्रिय शो Taarak Mehta Ka Ooltah Chashmah आता लवकरच अ‍ॅनिमेटेड स्वरूपात; नव्या अवतारात होणार दयाबेनची वापसी (Watch Promo)
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah (Photo Credit : Instagram)

टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेली कित्येक वर्षे छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारा हा शो आता लवकरच प्रेक्षकांसाठी अ‍ॅनिमेटेड स्वरूपात (Animated Series) दिसणार आहे. सोनीने मंगळवारी याबाबत माहिती दिली व या नवीन शोचा प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर केला. शोच्या या अ‍ॅनिमेटेड अवतारात टप्पू, जेठालाल, दयाबेन, बाबूजी आणि इतरही सर्व पात्रे दिसणार आहेत. विशेष म्हणजे या शोला निरोप घेणारी दयाबेन उर्फ ​​दिशा वकानी या अ‍ॅनिमेटेड मालिकेत दिसणार आहे. नुकतीच बातमी आली होती की, एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने या शोमध्ये परत येण्यास नकार दिला आहे.

सब टीव्हीचा एक हिट कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, आपली कथा आणि त्यातील पात्रांमुळे नेहमीच चर्चेत असतो. याचमुळे या शोचा टीआरपी खूप जास्त आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आवडेल अशी ही मालिका आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे हा शो लवकरच अ‍ॅनिमेटेड स्वरूपात येणार आहे. शोचे अ‍ॅनिमेटे व्हर्जन सोनी टीव्हीचे चॅनल ‘सोनी ये’वर प्रसारित होईल. सध्या प्रसिद्ध झालेल्या प्रोमोमध्ये जेठालाल, दयाबेन, टप्पू आणि बापुजी त्यांच्या खास शैलीमध्ये दिसून आले आहेत. (हेही वाचा: Mirzapur 3 ची तयारी सुरु? अभिनेत्री Shweta Triptahi ने पोस्टर शेअर करत दिले खास संकेत (See Post)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony YAY! (@sonyyay)

‘तारक मेहता... हा शो दयाबेन अर्थात दिशा वकाणी 2017 मध्ये सोडला होता. त्यानंतर तिचे चाहते ती या शोमध्ये परत येण्याची वाट पाहत आहेत मात्र आता दिशा हा शो करणार नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र आता या शोच्या अ‍ॅनिमेटेड व्हर्जनमध्ये दिशा वकाणीची छबी दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा कॉमेडी शो गेल्या 12 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. यात गोकुळधाम सोसायटीमधील रहिवाशांच्या सामान्य जीवनातील मजेशीर किस्से एका अनोख्या ढंगात दाखविले जातात. तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो, टीव्हीवर सर्वाधिक काळ चालू असलेला देशातील पहिला शो बनला आहे. शोचा पहिला भाग 28 जुलै 2008 रोजी प्रसारित झाला होता.