Mirzapur (Phpto Credit: Instagram)

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) ची वेबसिरीज मिर्झापूर (Mirzapur) प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मिर्झापूरचा पहिला सीजनने प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवली. तर दुसऱ्या सीजनलाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली. आता प्रेक्षकवर्ग तिसऱ्या सीजनच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान, मिर्झापूर सिरीज मधील अभिनेत्री श्वेता त्रिपाठी (Shweta Triptahi) ने नव्या सीजनचा संकेत देणारे ट्विट केले आहे. त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठी ने या सिरीजमध्ये गोलू गुप्ता ची भूमिका साकारली होती.

श्वेता त्रिपाठीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, "मी गोलू ला खूप मिस करत आहे. पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी आता अधिक वाट नाही पाहू शकत. गोलू ची भूमिका पुन्हा एकदा साकारण्यासाठी आता वाट नाही पाहू शकत. या शो ला जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दल प्रेम आहे. धन्यवाद मिर्झापूर." या पोस्टसोबत श्वेताने #MS3W हा हॅशटॅग वापरला आहे. तिच्या या पोस्टनंतरच मिर्झापूर 3 बद्दलच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. (Mirzapur Season 3 Announced: मिर्झापूर च्या चाहत्यांसाठी खुशखबर! निर्मात्यांकडून सीजन 3 ची घोषणा)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tripathi Sharma (@battatawada)

मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनमध्ये गुड्डू भैय्या आणि गोलू गुप्ता मिळून मुन्ना भैय्याला गोळी घालून ठार करतात. तर कालिन भैय्याला शरद वाचवतो. त्यामुळे मिर्झापूरची गादी नेमकी कोणाची होणार? हा प्रश्न दुसऱ्या सीजननंतरही अनुत्तरीत आहे. म्हणून प्रेक्षकांमध्ये सीजन 3 ची अधिक उत्सुकता आहे.