Mirzapur Season 3 (Photo Credits: Instagram)

Mirzapur Season 3 Announced: 'मिर्झापूर 2' (Mirzapur 2) ला प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता निर्मात्यांनी वेबसिरीजच्या तिसऱ्या सीजनची घोषणा केली आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या (Amazon Prime Video) मिर्झापूर वेबसिरीजचा पहिला सीजन प्रेक्षकांना अक्षरश: डोक्यावर घेतला. त्यानंतर मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिर्झापूर 2 प्रेक्षकांच्या भेटीला आला. दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, मिर्जापूर 2 च्या रिलीजच्या दोन दिवसांतच 50% लोकांनी वेबसिरीजचा आनंद घेतला. अवघ्या 7 दिवसांतच हा सर्वाधिक पाहिला जाणारा शो ठरला.

मिर्झापूर 2 च्या यशावर बोलताना निर्माता रितेश सिधवानी म्हणाले, "शो रिलीज होताच प्रेक्षकांनी दिलेले प्रेम सोशल मीडियावरील त्यांच्या प्रतिक्रीयांवरुन दिसून येते. त्यांच्या प्रतिसादामुळे आम्ही अत्यंत खुश आहोत." (Mirzapur 2 मधील माधुरी यादव हिचे खऱ्या आयुष्यातील 'हे' काही फोटो पाहून व्हाल थक्क, See Pics)

या शो मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा, ईशा तलवार या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. मात्र शो च्या दुसऱ्या सीजनमध्ये काही मुख्य कलाकारांची कथा समाप्त होते. मात्र गोष्ट पूर्ण होत नाही. त्यामुळे मिर्झापूर चा तिसरा सीजन येणार, याची खात्री प्रेक्षकांना होतीच. आता मात्र अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने देखील तिसऱ्या सीजनवर शिक्कामोर्तब केला आहे.

दरम्यान, हा तिसरा सीजन कधी रिलीज होणार याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मिर्झापूरच्या पहिल्या सीजननंतर दुसऱ्या सीजनसाठी प्रेक्षकांना 2 वर्ष वाट पाहावी लागली होती. आता सीजन 3 साठी किती प्रतिक्षा करावी लागणार, हे नव्या अपडेट्सनुसार स्पष्ट होईल.