Sugandha Mishra आणि Sanket Bhosale यांचा लग्नविवाह अडकला वादाच्या भोव-यात, पोलिसांनी दाखल केली FIR
Sugandha Mishra And Sanket Bhosale (Photo Credits: Instagram)

लोकप्रिय कॉमेडियन संकेत भोसले (Sanket Bhosale) आणि सुगंधा मिश्रा (Sungandha Mishra) यांचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला. मात्र काही दिवसांपूर्वीच झालेला हा विवाहसोहळा वादाच्या भोव-यात अडकला आहे. या विवाहसोहळ्यात कोरोनाचे नियम पाळण्यात आले नाही असा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली आहे. सुगंधा मिश्रावर लग्नाच्या वेळी कोरोना मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. संकेत आणि सुगंधाचा विवाह सोहळा पंजाबमध्ये पार पडला. जालंधरमध्ये या लग्नाच्या वेळी कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल फागवारा पोलिसांनी सुगंधाविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, सुगंधा आणि संकेत यांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी 26 एप्रिल रोजी लग्न केले. कोव्हिड मार्गदर्शक सूचनांनुसार लग्नात केवळ 40 लोक उपस्थित राहू शकतात. परंतु, आता असा आरोप केला जात आहे की, सुगंधा-संकेतच्या विवाहात 100 हून अधिक लोक उपस्थित होते. तथापि, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.हेदेखील वाचा- Sugandha Mishra Mehendi Ceremony Photos: अभिनेत्री सुगंधा मिश्रा लवकरच अडकणार विवाहबंधनात, मेहंदी सेरेमनीचे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल

लग्नानंतर संकेत भोसले याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संकेत बेडवर पडलेला दिसला आहे आणि त्याची बायको सुगंधा त्याला गुड मॉर्निंग म्हणतेय, तिच्या हातात चहाचा कप आहे आणि तिने विचारते की चहा प्यायचा आहे का? त्यानंतर ती संकेतलाच चहा बनवायला सांगते. लग्नानंतरचा त्यांचा हा क्युट मजेशीर व्हिडीओ सध्या खूपच लाईक केला जात आहे.

सुगंधा आणि संकेत अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तसचं गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सुगंधा आणि संकेत दोघांनी अनेक कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'द कपील शर्मा' या शोमध्ये संकेत संजय दत्तच्या रुपात चाहत्यांचं मनोरंजन करायचा. तर 'द कपील शर्मा' या शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत सुगंधानेदेखील प्रेक्षकांना पोटभर हसवलं आहे.