Rubina Dilaik सह अनेक लोकप्रिय अभिनेत्रींचे फोन नंबर्सचे झाले लीक; Abhinav Shukla ने मित्राच्या मदतीने वेबसाईट केली डिलीट
रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला (Photo Credits: Instagram)

सोशल मीडियावर, गोपनीयतेसंदर्भातील धोका अजूनही कायम आहे. सरकारदेखील याबाबत चार हात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याच्या, सोशल मीडियावर लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याच्या, एखाद्याचा मोबाइल नंबर लीक झाल्याच्या बातम्या दररोज कानावर येत आहेत. अशा परिस्थितीत सेलिब्रिटींनाही अशा गोष्टींना सामोरे जावे लागत आहेत. बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक (Rubina Dilaik) सोबतही असेच काही घडले आहे. रुबीना दिलैकचा फोन नंबर एका वेबसाइटने लीक केला होता, त्यानंतर तिला अनेक लोकांचे फोन यायला सुरुवात झाली.

बिग बॉस 14 ची विजेती झाल्यानंतर रुबीना दिलैकच्या लोकप्रियतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लोक तिला खूप पसंत करू लागले आहेत. अशा परिस्थितीत रुबिनासह अनेक अभिनेत्रींचा वैयक्तिक नंबर एका वेबसाईटने लीक केला होता. यानंतर वेगवेगळ्या नंबरवरून अभिनेत्रीला फोन-मेसेजेस यायला सुरुवात झाली. या प्रकारामुळे रुबीनाला अतिशय त्रास सहन करावा लागला. रुबीनाचा पती अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) याने या समस्येवर तोडगा काढला. त्याने आपल्या एका अभियंता मित्राच्या मदतीने, ही वेबसाइट डीजेबल केली.

स्वत: अभिनवने या संपूर्ण प्रकरणाची माहिती सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. अभिनवने लिहिले आहे, 'एका बेकायदेशीर वेबसाईटने रुबीनासह अनेक अभिनेत्रींचा नंबर सार्वजनिक केला होता. आता ही वेबसाइट डीजेबल केली आहे. यासाठी माझ्या इंजिनीअर मित्राचे आभार. अभियंत्यांशी पंगा घेऊ नका.’ हे पेज 3 दिवसात हटविले गेले आहे. या ठिकाणी 100 हून अधिक सेलिब्रिटींचे नंबर होते. (हेही वाचा: Rahul Vaidya लवकरच Nach Baliye ऐवजी Khatron Ke Khiladi 11 मध्ये झळकण्याची शक्यता)

दरम्यान, अभिनव शुक्लाने अभिनेता म्हणून करिअर सुरु करण्यापूर्वी, पंजाब विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स विभागातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे नंबर लीकची समस्या आल्यावर त्याने आपल्या मित्राच्या मदतीने ती सोडवली.