शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त पोस्टनंतर पायल रोहतगी हिने मागितली माफी (Watch Video)
Payal Rohtagi (photo Credits: Twitter)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर बिग बॉस फेम पायल रोहतगी (Payal Rohtagi) हिने माफी मागितली आहे. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं तिचं म्हणणं आहे. शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळातील नसून त्यांचा जन्म शुद्र शेतकरी कुटुंबात झाल्या असल्याचे विधान तिनं केलं होतं. तिच्या या विधानानंतर सोशल मीडियातून तिच्यावर प्रचंड टीका झाली. (शिवाजी महाराजांचा जन्म क्षुद्र शेतकरी घरात झाला होता, बिग बॉस फेम पायल रोहतगीचे वादग्रस्त विधान)

त्यानंतर तिने एक व्हिडिओ शेअर करत चक्क जाहीरपणे माफी मागितली आहे. तसंच तिने आपली बाजूही मांडली आहे. या व्हिडिओत तिने म्हटले आहे की, "मी एक सरळ साधा प्रश्न विचारला. मला शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायचे होते. पण सर्वांना असे वाटले की मी त्यांच्याबद्दल चुकीचे बोलते आहे. म्हणून मी सर्वांची माफी मागते. मी तुमच्या महाराजांबद्दल काही गोष्टी वाचल्या केवळ मला त्याविषयी खात्री करून घ्यायची होती. पण, माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी मला लक्ष्य करण्यात आलं. मला कोणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकारचं नाही. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच अस्तित्वात नाही हे मला आज समजलं."

पायल रोहतगी ट्विट:

अभिनेत्री पायल रोहतगी ही बिग बॉस सीजन 7 मध्ये राहुल महाजन सोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत आली होती. यापूर्वी देखील तिने महान व्यक्तीमत्त्वांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.