Dance Deewane 3 च्या सेटवर एका स्पर्धकासाठी Bharti Singh आणि Nora Fatehi एकमेकींना भिडल्या, व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
Nora Fatehi and Bharti Singh (Photo Credits: Instagram/Colors TV)

डान्स दिवाने 3 (Dance Deewane 3) च्या सेटवर अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी जितकी व्हायरल झाली तितकाच एक नवा प्रोमो व्हायरल होत आहे. या शोचो सूत्रसंचालक राघव जुयाल याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची जागा भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) याने घेतली. येत्या शनिवारच्या भागात या शोमध्ये नोरा फतेही (Nora Fatehi) प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे. तिने या शोमध्ये केलेली धमालमस्तीचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये भारती सिंह आणि नोराचे एक स्पर्धकाला घेऊन कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणाचे रुपांतर पुढे कशात झाले याचा अंदाज तुम्ही न केलेलाच बरा!

कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला नोरा स्पर्धक पीयूष गुर्भेले सोबत डान्स करताना दिसत आहे. तिला पाहून भारती स्टेजवर येते आणि पीयूषला खेचत डान्स करण्याचा प्रयत्न करते. तर लगेच नोरा पीयूषसोबत डान्स करण्याचा प्रयत्न करते. याच दरम्यान, भारती आणि नोरामध्ये भांडण होतं. पाहा पुढे काय होते ते....हेदेखील वाचा- 'Dance Deewane 3' च्या सेटवर कोरोनाचा धुमाकूळ! परीक्षक Dharmesh नंतर सूत्रसंचालक Raghav Juyal ला कोरोनाची लागण

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

या दोघीही पीयूषला खेचता खेचता स्टेजवर पडून जातात आणि चक्क एकमेकींच्या अंगावर झोपतात. यात भरडला गेला तो या शोमधील स्पर्धक पीयूष. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

नोरा फतेही आणि भारती सिंह यांची जोरदार जुगलबंदी आणि मजेदार किस्से या एपिसोड्समध्ये पाहायला मिळणार आहे. नोरा फतेही आपल्या डान्स तडक्याने या शोला चार चांद लावणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही.