मुंबई: पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालणा-या टीव्ही अभिनेत्याला अटक
(Photo Credits : File Image)

सध्याच्या काळात स्वत:ची लाईफस्टाईल जपण्यासाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकांना झटपट पैसा कमावण्याची इच्छा असते आणि या इच्छेखातर हे लोक काहीही करायला तयार असतात. मात्र त्यावेळी त्यांच्या हे लक्षात येत नाही की हा मार्ग चुकीचा आहे ज्याचा शेवट नक्कीच चांगला नाही. मात्र अशीच इच्छा मनात बाळगून एका टिव्ही अभिनेत्याने (TV Actor) अनेकांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपण पोलिस असल्याचे सांगून फिल्मी स्टाईलने या आरोपीने अनेकांना गंडवले आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) या आरोपीला अटक केली असून त्याला डेहराडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कारण या अभिनेत्याने डेहराडून येथील एक वृद्ध महिलेला फसवून तिच्याकडून पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती.

मुंबईतील गुन्हे शाखेच्या पथकाने ओशिवरा येथून अटक केली आहे. डेहराडून येथील एका वृद्ध महिलेला गंडा घालून तिच्याकडून या आरोपीने पाच लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी 3 डिसेंबर रोजी डेहराडून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.हेदेखील वाचा- Bihar Murder: धक्कादायक! सासू आणि जावयाच्या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या सासऱ्याची हत्या

हा आरोपी मुंबईत असल्याचे डेहराडून पोलिसांना कळताच त्यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार या मुंबई गुन्हे शाखेने सापळा रचून या आरोपीस अटक केली.

या आरोपीने आतापर्यत सावधान इंडिया, चितौडगड की राजकुमारी पद्मिनी सारख्या मालिकांत काम केले असून गुलमकाई, बहनचोर या सिनेमांमध्ये सहकलाकार म्हणून काम केले आहे.