'स्वराज्यरक्षक संभाजी' मधील 'ही' अभिनेत्री कोरोना काळात गरजूंना देतेय विनामूल्य जेवण, वाचा सविस्तर
Ashwini Mahangade (Photo Credits: Instagram)

देशात कोरोनाची दुसरी लाट ही दुप्पट वेगाने आली असून महाराष्ट्रात तर कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्व कलाकार, तसेच दिग्गज मंडळी आपापल्या परीने गरजूंना मदत आहे. यातच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजीराजेंच्या बहिणीची भूमिका साकारणारी अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) ही देखील या कोरोना काळात गरजूंना विनामूल्य जेवण देण्याचे काम करत आहे. सध्या अश्विनी 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघा हे पात्र साकारत आहे.

कुणाला औषध, तर कुणासाठी बेड शोधण्याची जबाबदारी घेता घेता आता अश्विनीने आता त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि या रुग्णांसाठी अन्नदानासारखे काम हाती घेतले आहे. कुठल्याही मदतीचा गवगवा न करता अतिशय शांतपणाने ती लोकांची मदत करत आहे.हेदेखील वाचा- 'आई कुठे काय करते' या मालिकेतील कलाकारांची आऊटडोअर शूटिंगदरम्यान ऑफस्क्रिन चाललेली धमालमस्ती तुम्ही पाहिली का?, Watch Photos

"पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय. कोरोनाच्या या महासंकटात बाहेर सर्वच गोष्टीची टंचाई निर्माण झाली आहे. या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे. आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती व शक्य त्या ठीकाणी आमचं कर्तव्य पार पाडीत आहोत. तुम्हीही यामधे सामील व्हा.", असे आवाहन तिने तिच्या या पोस्टमधून केले आहे. सध्या खंडाळा, फलटण, शिरवळ, सातारा, केसुर्डी अशा अनेक शहरांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे

छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येची अर्थात ‘राणू अक्कां’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थादेखील चालवते. या संस्थेअंतर्गत आजवर तिने अनेक उपक्रम राबवले आहेत, याशिवाय गत वर्षी लॉकडाऊन दरम्यान देखील तिने अशाच प्रकारे लोकांची मदत केली होती.