'आई कुठे काय करते' या मालिकेतील कलाकारांची आऊटडोअर शूटिंगदरम्यान ऑफस्क्रिन चाललेली धमालमस्ती तुम्ही पाहिली का?, Watch Photos
Aai Kuthe Kai Karte (Photo Credits: Instagram)

कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण हे राज्याबाहेर होत आहे. यात अनेक मालिकांचे गोवा, सिल्व्हासा येथे चित्रीकरण सुरु आहे. दरम्यान स्टार प्रवाहवरील लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट ठरलेली मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kai Karte) चे देखील राज्याबाहेर शूटिंग सुरु आहे. घरापासून दूर असल्याकारणाने या मालिकेतील कलाकार फावल्या वेळेत शूटिंगच्या ठिकाणी धमालमस्ती करत असल्याचे व्हिडिओज आणि फोटोज सध्या व्हायरल होत आहे. यात मालिकेतील अरुंधती, अविनाश, आप्पा, ईशा, संजना सर्वच धमालमस्ती करताना दिसत आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत सवत दाखवलेल्या अरुंधती आणि संजना झोपाळ्यावर छान झोके घेताना दिसत आहे.

मालिकेत नेहमी साडीत बघितलेल्या अरुंधतीचा मॉडर्न लूक पाहून तिचे चाहतेही चक्रावले आहेत.

तर दुसरीकडे अविनाश आणि आप्पा जुन्या गाण्यांवर रिल्स व्हिडिओ करताना दिसत आहे.हेदेखील वाचा- 'येऊ कशी तशी मी नांंदायला' सह अनेक मराठी मालिका पुढील चित्रीकरणाच्या शूट साठी गोवा, सिल्वासा मध्ये दाखल; कलाकारांनी शेअर केले BTS, पहा फोटोज

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

एकूणच लॉकडाऊन निमित्त आऊटडोअर शूट गेलेली आई कुठे काय करते या मालिकेची शूटिंग आणि शूटिंगनंतर धमाल करतायत हेच या फोटोजवरून दिसत आहे.

या मालिकेविषयी बोलायचे झाले तर ही मालिका आता रंजक वळणावर आली असून लवकरच यात अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा समारंभ दाखविला जाणार आहे.