Abhindya Bhave आपल्या पती मेहुल पै सह मकर संक्रांती निमित्त काळ्या वेशात समुद्र किना-यावर केले खास फोटोशूट, See Pics
Abhidnya Bhave Photoshoot (Photo Credits: Instagram)

मकर संक्रांती (Makar Sankranti) सणाचे विशेष कौतुक आणि विशेष उत्साह असतो तो नवविवाहित दाम्पत्यांसाठी! त्यांच्यासाठी नवीन वर्षातील हा पहिला सण असतो. यंदा वा 2020 च्या अखेरीस अनेक मराठी कलाकारांचे लग्न झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी मकर संक्रांतीचा हा पहिला सण असणार. त्यातच नुकतेच लग्न झालेली अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) सुद्धा या सणासाठी प्रचंड उत्साही आहे. तिने आपल्या पती मेहुल पै (Mehul Pai) सोबत एका छान समुद्र किना-यावर जाऊन काळ्या रंगाच्या वेषात छान फोटोशूट केले आहे. अभिज्ञाने हे फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केले असून सध्या हे फोटोज व्हायरल होत आहे.

या फोटोजमध्ये अभिज्ञा आणि मेहुलचा लूक खूपच हटके आहे. यात अभिज्ञाने काळ्या रंगाची नववारी नेसली असून तिच्या पती मेहुल पै ने काळ्या रंगाचे धोतर आणि च्यावर काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. एका समुद्र किनारी या दोघांनी हातात हात घालून छान फोटोशूट केले आहे.हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021 निमित्त अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांसह 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी शेअर केले ब्लॅक साडी लूक!

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

या फोटोज आतापर्यंत अनेक लाइक्स मिळाले आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अभिज्ञाने हे फोटोज सोशल मिडियावर शेअर करुन सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टेलिव्हिजन मधील मालिकांमधून झळकणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने अखेर मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली आहे. 6 जानेवारीला अगदी साधेपणाने हा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटोज, व्हिडिओज देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.