Majha Hoshil Na मालिकेतील सई आणि आदित्य चा Valentine's Day दिवशी उडणार लग्नाचा बार, Watch Video
Majha Hoshil Na (Photo Credits: Instagram/ZeeMarathi)

झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना' (Majha Hoshil Na) सध्या रंजक वळणावर येऊन ठेपलीय. सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागलेल्या सई बिराजदार (Sai Birajdar) आणि आणि आदित्य कश्यप (Aditya Kashyap) चा लग्नसोहळा आता लवकरच छोट्या पडद्यावर सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या मालिकेत या दोघांच्या लग्नात येणारे विघ्न प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे लग्न कसे आणि कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. हा लग्नसोहळा येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेनटाईन डे (Valentine's Day) दिवशी झी मराठीवर सर्वांना पाहता येणार आहे.

थोडक्यात समशेर सिंग आणि लाज्जो च्या लग्नासाठी 14 फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचाा दिवस मुहूर्त ठरणार असल्यामुळे या दिवशी नेमकं काय काय होणार याबाबतची प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्या लग्नसोहळ्याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर पोस्ट करण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Aastad Kale-Swapnali Patil Wedding: बिग बॉस मराठी 1 मधील आणखी एक स्पर्धक चढणार बोहल्यावर, लग्नासाठी निवडला प्रेमाचा दिवस!

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

थोडक्यात येत्या 14 फेब्रुवारीला सई आणि आदित्यच्या लग्नाची गाठ बांधली जाणार आहे. सध्या ज्या ट्रॅकवर ही मालिका सुरु आहेत त्यात आदित्य सोबत जिचे लग्न होणार होते त्या मेघना साखरपुडा करण्यास नकार देऊन सई आणि आदित्यला वाट मोकळी करुन दिली. मात्र सुयश अजूनही या दोघांच्या प्रेमात आडकाठी आणत आहे. त्यासाठी दरदिवसा तो नवनवी खेळी खेळत आहे.

तर दुसरीकडे आदित्यचा चारही मामांनी सई आणि आदित्यचे लग्न लावणारच असा पण घेतला आहे. त्यासाठी ते देखील जोरदार तयारी करत आहे. दरम्यान सुयशच्या तावडीत असलेल्या सईची आदित्य आणि त्याचे मामा कशी सुटका करणार आणि हे लग्न कसे होणार हे येत्या काही दिवसांतच कळेल.