Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी 14' चे शूटिंग सुरु; रोमानियामधून समोर आला असीम रियाझ आणि कृष्णा श्रॉफ यांचा व्हिडिओ
असीम रियाझ आणि कृष्णा श्रॉफ यांचा व्हिडिओ (PC - X/@Pratham_Jodop)

Khatron Ke Khiladi 14: एडवेंचर रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी सीझन 14' (Khatron Ke Khiladi 14) सध्या चर्चेत आहे. शोमधील सर्व खेळाडूंची नावे समोर आली आहेत. रोहित शेट्टी (Rohit Shetty) सोबत धोकादायक खेळ खेळण्यासाठी सर्व खेळाडूंनी तयारी केली असून ते शूटिंगच्या ठिकाणीही रवाना झाले आहेत. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'खतरों के खिलाडी 14' या शोचं सूत्रसंचालन केले आहे. दरवर्षी शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होते, मात्र यावेळी शूटिंग रोमानियामध्ये होत आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व स्पर्धक मुंबईहून रोमानियाला निघाले होते. आता त्याचा पहिला व्हिडिओ तिथून समोर आला आहे.

'खतरों के खिलाडी 14' मध्ये शालिन भनोतदेखील दिसणार आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर रोमानियातील पहिला व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो असीम रियाझसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये शालिन अभिषेक कुमारसोबत बसला आहे. तो कॅमेरा असीम रियाझ आणि कृष्णा श्रॉफकडे वळवतो. असीम, अभिषेक आणि कृष्णा व्यतिरिक्त इतर स्पर्धक देखील शालिन भानोतच्या व्हिडिओमध्ये बसले आहेत. सर्व खेळाडू बसमध्ये आहेत. क्लिपसोबत शालिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सकाळच्या हास्यापेक्षा चांगले काहीही नाही.' त्याने तिघांनाही 'खतरों के खिलाडी 14' या हॅशटॅगने टॅग केले आहे. (वाचा - BIGG BOSS Marathi 5 Promo: Riteish Deshmukh बिग बॉस मराठी चा नवा होस्ट; पहा प्रोमो)

पहा व्हिडिओ- 

रोहित शेट्टीच्या रिॲलिटी शोचे शूटिंग सुरू झाले आहे. ते जुलैमध्ये टीव्हीवर ऑन एअर होईल. यावेळी अभिषेक, शालिन, असीम, कृष्णा व्यतिरिक्त शिल्पा शिंदे, सुमोना चक्रवर्ती, आशिष मेहरोत्रा, निम्रत कौर अहलुवालिया, गश्मीर महाजनी, नियती फतनानी, करण वीर मेहरा आणि आदिती शर्मा हे खेळाडूदेथील शोमध्ये दिसणार आहेत.