Khatron Ke Khiladi 10: 'खतरों के खिलाडी 10' आजपासून सुरु; छोट्या पडद्यावरील सर्वात साहसी शोमध्ये अमृता खानविलकरसह सहभागी होणार 'हे' 10 सेलेब्ज
Khatron Ke Khiladi 10 (Photo Credits: Twitter)

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात साहसी आणि खतरनाक शी, 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 10) आजपासून सुरु होत आहे. या शोचा सीझन 10, शनिवारपासून 22 फेब्रुवारीपासून प्रक्षेपित होणार आहे. या कार्यक्रमाचा होस्ट आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) याच्यासह टीव्हीचे धाडसी सेलेब्स आजपासून हा रोमांचक प्रवास सुरू करणार आहेत. शोमध्ये भीतीची पातळी काय असेल आणि रोहितच्या साहसी विद्यापीठाचे स्पर्धक कोण असतील ते जाणून घेऊया.

'खतरों के खिलाडी' सीझन 10 चा पहिला भाग 22 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होईल. हा शो कलर्स चॅनलवर प्रसारित होईल.

रोहित शेट्टी हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत. रोहितने यापूर्वी आणखी 5 सीझन होस्ट केले आहेत. 'खतरों के खिलाडी 10' चे प्रोमो व्हिडिओही यापूर्वी आले आहेत. या व्हिडिओंमध्ये भिन्न प्रकारचे साहसी गेम्स दिसून येत आहे. या वेळी सेलिब्रिटींना केवळ साहसी व धोकादायक स्टंटमध्येच नव्हे, तर वन्य आणि धोकादायक प्राण्यांमध्ये देखील हे स्टंट करावे लागणार आहेत. शोचे शूटिंग बल्गेरियात (Bulgaria) झाले आहे. बल्गेरियातील सुंदर ठिकाणी असे साहसी खेळ आणि स्टंट प्रेक्षकांना नक्कीच मोहित करु शकतात.

यावेळी 'खतरों के खिलाडी 10' मध्ये टीव्हीचे लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. करिश्‍मा तन्‍ना (Karisma Tanna), रानी चटर्जी, करण पटेल (Karan Patel), आरजे मलिष्‍का (RJ Malishka), अदा खान, श‍िविन नारंग, धर्मेश येलांदे, बलराज स्‍याल, तेजस्‍वी प्रकाश, अमृता खानविलकर शोचा भाग असणार आहेत. हे सर्व 10 स्पर्धक एकमेकांना कोणत्या प्रकारे आणि कोणत्या गेम्सद्वारे एकमेकांना टक्कर देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रत्येक वेळी प्रमाणे या वेळीही स्टंट खूप धोकादायक असणार आहेत. हायस्पीड ट्रेनवरुन बाइक ओलांडून नेणे, सिंह, अजगर आणि कीटकांमध्ये खेळ सादर करणे, पाण्यात स्टंटिंग करणे, उंच उंचीवरून खाली उडी मारणे अशाप्रकारे, रोहितने अनेक धोकादायक खेळ आणले आहेत. (हेही वाचा: अभिनेता पारस छाब्रा याच्या Mujhse Shaadi Karoge मध्ये झळकली मराठी बिग बॉसमधील सुपर हॉट हिना पांचाळ)

दरम्यान, या वेळी या कार्यक्रमात सात खास पाहुणे येणार आहेत. अभिषेक वर्मा, स्मृती कालरा, सलमान यूसुफ खान, भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, बीर मायरा या शोमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत.